आयपीएल 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आले असून मुंबईला कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट नसल्यामुळे या सामन्यात संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे.
टॉस जिंकून सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसून तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून नंतर फलंदाजीसाठी उतरू शकतो. मुंबईच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. ट्रेंट बोल्टला बाहेर ठेवत कॉर्बिन बॉशला संधी देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, एएम गजनफर आणि रघु शर्मा.
इम्पॅक्ट सब्स: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट.
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स संघात तीन बदल पाहायला मिळाले आहेत. मुकुल चौधरीला वगळून अक्षत रघुवंशीला संधी देण्यात आली आहे. तसेच जोश इंग्लिसचा संघासाठी पदार्पण सामना ठरला आहे. आवेश खानचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श, एडेन मार्कराम, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंह, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आवेश खान आणि प्रिन्स यादव.
इम्पॅक्ट सब्स: मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश सिंह राठी, मयंक यादव, शाहबाज अहमद, अब्दुल समद.
विशेष म्हणजे, जोश इंग्लिस यांनी याआधी आयपीएलमध्ये पदार्पण केले असले तरी लखनऊ संघासाठी हा त्यांचा पहिलाच सामना आहे.




