---Advertisement---

यशस्वी जायस्वालने मोडला रोहितचा मोठा रेकॉर्ड! आयपीएलच्या ‘या’ खास यादीत गाठले पहिले स्थान

On: रविवार, मे 24, 2026 6:23 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर यशस्वी जायस्वालने आयपीएल २०२६ च्या आपल्या शेवटच्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चांगली सुरूवात केली, मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. तो मुंबई विरुद्ध १७ चेंडूंत ३ षटकार आणि एक चौकार मारत २७ धावा करत बाद झाला. त्याने त्याच्या या छोट्या खेळीने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला आहे.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यशस्वीने षटकार मारला आणि तो या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या षटकामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने ही कामगिरी आतापर्यंत १४ वेळा केली असून रोहितच्या १३ षटकारांना मागे टाकले.

यशस्वीने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक १४ षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला. त्याने २७९ चेंडूंचा सामना करताना ही कामगिरी केली. रोहितने ३८७ चेंडूंमध्ये १३ षटकार मारले आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक फलंदाज क्रिस गेल यांनी प्रत्येकी १२-१२ षटकार मारले. विराट कोहलीनेही तेवढेच षटकार मारले आहेत.

आयपीएलच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू-
१४ – यशस्वी जायस्वाल (२७९ चेंडू)
१३ – रोहित शर्मा (३८७ चेंडू)
१२ – वीरेंद्र सेहवाग (२४१ चेंडू)
१२ – क्रिस गेल (३६४ चेंडू)
१२ – विराट कोहली (४२२ चेंडू)
११ – सुनील नरेन (१४१ चेंडू)
१० – ब्रेंडन मॅक्युलम (२४३ चेंडू)

मुंबईचा डाव सुरू झाला असता रोहित शून्यावर तंबूत परतला. त्यामुळे हा विक्रम यशस्वीच्या नावावर कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---