इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेले संघ म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स होय. या दोन्ही संघांनी या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच हे दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप ४ संघांमध्ये आहेत. अशात मंगळवारी (दि. १० मे) लखनऊ आणि गुजरात संघात आयपीएल २०२२चा ५७वा सामना पार पडला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला गेला. मात्र, या सामन्यात गुजरातकडून फलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर जोरदार ट्रोल होत आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना गुजरात संघाला निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या. यामध्ये शुबमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ४९ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. या धावा करताना त्याने ७ चौकारही मारले. मात्र, हंगामात सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये असलेला कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यात फक्त ११ धावाच करू शकला. यामुळे त्याला नेटकरी जोरदार ट्रोल करत आहेत.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या गुजरातची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. त्यांचे दोन महत्त्वाचे खेळाडू ४.२ षटकात तंबूत परतले. यावेळी वृद्धिमान साहा (५ धावा) २.२ षटकात आणि मॅथ्यू वेड (१० धावा) ४.२ षटकात माघारी परतला. यानंतर शुबमन गिलने डाव सांभाळला आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पंड्या १३ चेंडूत ११ धावा करत बाद झाला. तो बाद होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका युजरने ट्वीट करत लिहिले होते की, “घमंड सर्वांचा तुटतो, हा तर हार्दिक पंड्या होता.” मात्र, हे ट्वीट नंतर डिलीट केले गेले. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आता काही सामन्यांपासून चांगला खेळतोय, सुरुवातीला काही गैरसमजामुळे धावा बनल्या होत्या.”
#HardikPandya अब बेहतर खेल रहा कुछ मैचों से, शुरू में कुछ ग़लतफ़हमी की वजह से रन बन गए थे ????????????????#IPL2022
— Vaibhav Mishra (@baibhawmishra) May 10, 2022
इतर काही ट्वीट्स-
I don't like hardik Pandya the batter
..he is finisher and at no 5 or 6 then go on to ball no 1 ..#LSGvsGT #GTvsLSG #TATAIPL2022 #TATAIPL2022 #avade— bracking bad???? (@ShadowGod3X) May 10, 2022
Hadik pandya playing against today:
Brother krunal
Teammate decock (MI)
Best friend kl rahul#HardikPandya #klrahul #IPL2022 #gujarattitans #LSGvsGT— Koushik (@Koushiksunny14) May 10, 2022
Hardik Pandya still hasn't come off his helmet. He looks so disappointed. pic.twitter.com/rPFf13wihf
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 10, 2022
Ye match agar gujarat harta he to uska jimmedar hardik Pandya khud he
— Priyank (@Rajput42580635) May 10, 2022
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तसेच, गुजरात टायटन्स संघ दुसऱ्या स्थानी आहे. या सामन्यानंतर आयपीएल २०२२चा पहिला प्लेऑफमध्ये जाणारा संघ मिळणार आहे.






