---Advertisement---

GTvsCSK । गुजरात-चेन्नईचे महत्वाचे खेळाडू अनुपस्थितीत, ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 12:46 PM
Gujarat Titans
---Advertisement---

आयपीएल 2023 हंगाम शुक्रवारी सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स पहिल्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंसह या सामन्यासाठी मैदानात उतरतील. पण काही खेळाडू असे आहेत, जे आपल्या वैयक्तिक कारणास्तव या सामन्यात खेळू शकणार नाहीत. चला तर जाणून घेऊ दोन्ही संघांची संभावित प्लेइंग 11 विषयी.

गुजरात टायटन्ससाठी मगच्या हंगामात डेविड मिलरने फिनिशरची भूमिका चोख पार पाडली होती. तसेच श्रीलंकन संघ यावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ज्यामुळे महेश तिक्षणा आणि मतिशा पथिराना पहिल्या सामन्यात सीएसकेसाठी खेळू शकणार नाहीत. हे दोन्ही श्रीलंकन खेळाडू 8 एप्रिल नंतर संघाशी जोडले जातील.

दरम्यान, हंगामातील पहिल्या सामन्याच्या आधी अजून एक मोठी बातमी समोर आली होती. माहितीनुसार सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी सराव करताना दुखापतग्रस्त झाला होता. सराव करताना धोनीच्या डाव्या गुढल्याला दुखापत झाल्याचे सांगितले गेले होते. पण पहिल्या सामन्याआधी सीएसच्या सीईओंनी हे स्पष्ट केले की, धोनी या सामन्यासाठी फिट आहे. अशात गुजरात विरुद्धच्या या पहिल्या सामन्यात धोनी चाहत्यांना खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आपल्या मुळ संघासोबत खेळण्यासाठी ओळखले जातात. हे दोन्ही संघांमध्ये होणारे बदल अगदीच कमी प्रमाणात असतात. अशात मागच्या हंगामात संघ ज्या 11 खेळाडूंसह खेळला, त्याच खेळाडूंसह यावर्शीही खेळेल, अशी शक्यता आहे.

दोन्ही संघांची संघावित प्लेइंग इलेव्हन –
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मिचेल सॅटनर, दीपक चाहर, सिमरजीत सिंग/तुषार देशपांडे.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल, रिद्धिमान सहा, केन विलियम्सन, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, शिवम मावी, जयंत यादव/ आर साई किशोर, उल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी.
(GT vs CSK. In the absence of key players from Gujarat-Chennai, ‘this’ is the probable playing eleven)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पुणे, मुंबई उपनगर, अहमदनगर व रायगड संघाची विजयी सलामी.
सॅमसनने पाडलाय जो रुटवर प्रभाव! राजस्थानच्या कॅम्पमध्ये इंग्लिश फलंदाज भलताच खुश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---