क्रिकेटविश्वात असे खूपच कमी खेळाडू आहेत, जे खेळाडू आणि कर्णधार म्हणून चमकले. त्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी या दिग्गजाचाही समावेश होतो. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीच्या नेतृत्वावर फक्त भारतीयच नाही, तर संपूर्ण क्रिकेटविश्व फिदा आहे. मैदानावर कोणतीही परिस्थिती असो, तो नेहमीच शांततेच त्या परिस्थितीचा सामना करतो आणि त्यातून मार्ग काढतो. शेवटच्या क्षणी सामन्याला कलाटणी देण्याचे धोनीचे कौशल्य कमालीचे आहे. अशातच ऑस्ट्रेलिया स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने एमएस धोनीचे कौतुक केले आहे.
स्मिथकडून धोनीचं कौतुक
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला की, त्याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्याकडून प्रत्येक परिस्थितीत मैदानावर शांत राहण्याची कला शिकली आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये धोनीसोबत रायझिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiants) संघाकडून खेळला आहे. पहिल्या हंगामात धोनीने पुणे संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, भारताचे नेतृत्व सोडल्यानंतर पुढील हंगामात पुणे संघाने कर्णधारपद स्मिथकडे सोपवले होते.
‘माही’कडून शिकली मैदानावर शांत राहण्याची कला
स्टीव्ह स्मिथ याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “मला वाटते की, मी धोनीकडून मैदानावर शांत राहण्याची कला शिकली आहे. मी त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत पाहिले आहे की, तो कशाप्रकारे प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बिल्कुल बदलत नाहीत. कदाचित हीच ती गोष्ट आहे, जी मी त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला.”
धोनीचे गुणगान गाताना स्मिथ पुढे म्हणाला की, “निश्चितच त्याने दीर्घ कारकीर्दीत शानदार कामगिरी केली. तो क्रिकेट खेळणारा सर्वोत्तम कर्णधार म्हणून ओळखला जाईल. मला जेव्हा फोन आला, तेव्हा तो म्हणाला की, ‘माझी इच्छा आहे की, तू संघाचे नेतृत्व करावे.’ हे खूपच भीतीदायक होते. मात्र, त्या हंगामात धोनी लाजवाब ठरला होता. त्याने सर्व बाजूंनी माझी मदत केली, तो एक कमालीची व्यक्ती आहे. त्याला आपल्या नेतृत्वाखाली खेळताना पाहणे खूप शानदार होते आणि खूप भीतीदायक अनुभव होता.”
आयपीएलमध्ये स्मिथ करणार समालोचन
आयपीएल 2022 स्पर्धेत खरेदीदार न मिळाल्यामुळे आयपीएल 2023मध्ये स्मिथने नाव दिले नव्हते. अशात वृत्त आहे की, स्मिथ या स्पर्धेत समालोचन करणार आहे. या स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (cricketer steve smith praises ms dhoni captaincy read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ते नक्कीच कमबॅक करतील, त्यांच्याकडे महान खेळाडू आहेत’, शेन वॉटसनचे बलाढ्य संघाबाबत मोठे भाष्य
आयपीएलच्या एक दिवसाआधीच नरेंद्र मोदी स्टेडिअमबाबत मोठी बातमी, गुजरात टायटन्सशी आहे संबंध