---Advertisement---

GT vs LSG: सामन्यात मिशेल मार्शची अनुपस्थिती, ऋषभ पंतने सांगितले कारण

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 6:21 PM
---Advertisement---

लखनऊच्या एकाना स्टेडियम वर 12 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना खेळला जात आहे. या सामन्यांमध्ये मिशेल मार्श सामन्यातून बाहेर आहे. तसेच तो संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या पाच डावात चार अर्धशतक केले आहेत. तो दुखापतीच्या कारणाने बाहेर झाला नाही. नाणेफेकीच्या दरम्यान लखनऊच्या कर्णधार ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया सलामी फलंदाज बाहेर पडल्याचे कारण सांगितले आहे.

लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने सांगितले की, त्यांच्या संघात आज फक्त एकच बदल झाला आहे. मिशेल मार्श खेळणार नाही. त्याच्या जागेवर हिम्मत सिंग याला प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले आहे.

ऋषभ पंतने सांगितले की, मिशेल मार्शच्या मुलीची तब्येत खराब आहे. या कारणाने तो तिची देखभाल करत आहे आणि त्यामुळेच आजचा सामना तो खेळत नाही. त्याची मुलगी सध्या भारतातच आहे, मिशेल मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये बाबा झाला आहे, त्याची पत्नी ग्रेटा मॅकने 17 नोव्हेंबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला होता. तिचं नाव त्यांनी ओलिव ठेवलं आहे. त्याची मुलगी सध्या फक्त पाच महिन्यांची आहे.

मिशेल मार्शने आतापर्यंत 5 सामन्यात 4 अर्धशतक झळकावले आहेत. त्याने शानदार प्रदर्शन केल आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने 72 धावा केल्या होत्या, हैदराबाद विरुद्ध दुसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या. पंजाब किंग्स विरुद्ध तो 0 वरच बाद झाला. तसेच मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने 60 धावा तर शेवटच्या सामन्यात त्याने केकेआर विरुद्ध 81 धावा केल्या होत्या. त्याच्या अनुपस्थितीत लखनऊ संघ कशाप्रकारे फलंदाजी करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---