सध्या भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा खेळले जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या दहा दिवसात अनेक रोमांचक सामने क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले. भारतातील एकूण दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जातोय. त्यापैकी एक ठिकाण पुणे आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर स्पर्धेतील पाच सामने खेळले जातील. या सामन्यांना 19 ऑक्टोबर पासून सुरुवात होईल मात्र सामने पाहण्यासाठी येताना चाहत्यांना काही अटी पाळणे बंधनकारक राहील.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे एमसीए स्टेडियम येथे सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी नियमावली
1. स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारच्या तिकिटांची विक्री होणार नाही. केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या तिकिटांच्या प्रती बॉक्स ऑफिसवर उपलब्ध होतील.
2. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी मोफत पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. बाहेरून कोणत्याही प्रकारचे खाद्य अथवा पेय आणण्यास सक्त मनाई आहे
3. स्टेडियमवर असलेल्या फूड स्टॉलमध्ये विविध पदार्थ सशुल्क उपलब्ध असतील.
4. मैदानाबाहेर पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. 6000 चारचाकी व 15000 दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे.
5. सामना सुरू होण्याच्या एक तासआधी मैदानात उपस्थित व्हावे.
6. मैदानाबाहेर दिलेल्या सूचनांचा सक्तीने अवलंब करणे बंधनकारक राहील.
एमसीए स्टेडियम येथे होणारे सामने
भारत विरुद्ध बांगलादेश (19 ऑक्टोबर)
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (30 ऑक्टोबर)
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (1 नोव्हेंबर)
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स (8 नोव्हेंबर)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (11 नोव्हेंबर)
(Guidelines For World Cup Matches At MCA Pune)
महत्वाच्या बातम्या –
हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ पठ्ठ्या ठरला फिल्डर ऑफ द मॅच, शार्दुलच्या हस्ते सन्मान