प्रो कबड्डी लीगच्या ८ व्या हंगामात गुरुवारी चौथा सामना गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स संघात पार पडला. बंगळुरूच्या शेराटन ग्रँड, व्हाईटफिल्ड येथे झालेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सने ३४-२७ अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला. हा या हंगामातील गुजरात जायंट्सचा पहिला विजय ठरला आहे. त्यामुळे गुजरातने ५ गुणांची कमाई केली आहे.
या सामन्यात गुजराज संघासाठी राकेश नरवाल आणि गिरिश एर्नाक विजयाचे नायक ठरले. राकेशने सर्वाधिक ७ रेडिंग पाँइंट्स मिळवले, तर गिरिषने डिफेन्समध्ये ७ गुण मिळवले.
#SuperhitPanga ke doosre din ki shuruaat – Ek aur Blockbuster ke saath! 😍@GujaratGiants beat @JaipurPanthers in an epic thriller to start their campaign on a winning note! 🔥#GGvJPP #vivoProKabaddi pic.twitter.com/VCPJvRN3bU
— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2021
प्रो कबड्डी लीग २०२१-२२ हंगामाला बुधवारपासून (२२ डिसेंबर) सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या दिडवर्षात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शांत झालेले कबड्डीविश्वात पुन्हा उत्साह संचारलेला दिसून येत आहे.
अधिक वाचा – क्लब कबड्डी ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा कल्याणचा ‘पोस्टर बॉय’ श्रीकांत जाधव
आठव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील पहिल्या दिवशी ‘यू मुंबा’ संघाने प्रतिस्पर्धी ‘बंगळुरु बुल्स’ संघाचा ४६-३० च्या फरकाने फडशा पाडत हंगामातील पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली होती. तसेच तेलगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यात ४०-४० अशी बरोबरी झाली. तिसरा सामना बंगाल वॉरियल्सने युपी योद्धाला ३८-३३ च्या फरकाने पराभूत करत जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१ : ‘बंगाल वाॅरियर्स’चा ‘युपी योद्धा’ संघाला दणका, ३८-३३च्या फरकाने सामना घातला खिशात