इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सुरू झाल्यापासून भारतीय क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदलले. आयपीएलच्या धर्तीवर अनेक राज्य क्रिकेट संघटनांनी आपल्या लीग देखील सुरू केल्या आहेत. यामध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेची तमिळनाडू प्रीमियर लीग ही स्पर्धा सर्वात यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेतून पुढे आलेले अनेक खेळाडू आयपीएल खेळताना दिसले. याच टीएनपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव नुकताच पार पडला. यामध्ये गुजरात टायटनचे प्रतिनिधित्व केलेल्या साई सुदर्शन याच्यावर सर्वाधिक बोली लागली.
स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी (23 फेब्रुवारी) खेळाडूंचा लिलाव पार पडला. यांनी लिलावात स्पर्धेतील आठही संघांनी सहभाग नोंदवला. युवा फलंदाज व आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघासाठी खेळलेल्या डावखुऱ्या बी साई सुदर्शन याच्यावर सर्वाधिक बोली लागली. लायका कोवई किंग्स संघाने सर्वाधिक 21.60 लाख रुपये मोजत त्याला आपल्या संघात चांगली करून घेतले.
साई सुदर्शन गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. मागील वर्षी आयपीएल लिलावात गुजरातने त्याला 20 लाखांच्या बेस्ट प्राईसवर आपल्या संघात समाविष्ट केलेले. त्याने हंगामात केवळ पाच सामने खेळताना एका अर्धशतकाच्या मदतीने 145 धावा बनवलेल्या. त्याने आतापर्यंत 18 टी20 सामने खेळताना 33 च्या सरासरीने व 122 च्या स्ट्राईक रेटने 497 धावा बनवल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या दोन्ही स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिलेली.
या लिलावात त्याच्यानंतर अष्टपैलू संजय यादव याच्यावर 17.60 लाख रुपयांची बोली लागली. त्याला चेपॉक सुपर गिलीजने विकत घेतले. रविचंद्रन अश्विन भाग असलेल्या डिंडीगुल ड्रॅगन्सने शिवम सिंग याला 15.95 रुपयांच्या बोलीसह आपल्याकडे घेतले.
(Gujarat Titans Batter Sai Sudarshan Become Coestlist Player In TNPL Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’