भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान भारतीय संघाने विजय मिळवला असून 2-0 अशी आघाडी घेतली. सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स मायदेशात परतला आणि तो तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. संघासाठी हा मोठा धक्का असला, तरी एक चांगली बातमी देखील ऑस्ट्रेलियाला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन तिसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे फिट आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेलला जाईल.
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत बारताने 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर ट्रॉफी भारताकडे कायम राहणार यात शंका नाही. ऑस्ट्रेलियन संघ मात्र स्वतःचे नाक राखण्यासाठी पुढच्या दोन सामन्यात विजयासाठी शक्तते सर्व प्रयत्न करेल. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) त्याच्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मायदेशात परतल्याचे सांगितले जात आहे. कमिन्सने तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती देखील दिली. अशात स्टीव स्मिथ (Steve Smith) या सामन्यातून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद बजावताना दिसेल. कॅमरून ग्रीन (Cameron Green)स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियासाठी पुनरागमन करू शकतो.
ग्रीम मागच्या काही दिवसांपासून हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. पण तिसऱ्या कसोटीसाटी पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती ग्रीनने स्वतः दिली. दुखापतीतून सावल्यानंतर ग्रीन म्हणाला, “आतापर्यंत सर्वकाही ठीक राहिले आहे. मागच्या सामन्यातही मी खेळणारच होतो, पण दुखापतीतून सावरण्यासाटी अजून एक आठवडा दिला तर ठीक राहील, असा विचार केला. आता मी खेळण्यासाठी 100 टक्के तयार आहे.” दरम्यान, दिल्ली कसोटीत सहा विकेट्सने पराभव स्वीकाल्यानंतर पुढच्या सामन्यासाठी जवळपास 10 दिवसांचा वेळ होता. अशात ऑस्ट्रेलियचे काही खेळाडू गोल्फ खेळण्यासाठी गेले, तर काहींनी पर्यटनाला प्रधान्य दिले. पण ग्रीन मात्र दरम्यानच्या काळात मैदानात सराव करताना दिसला आणि आगामी सामन्यासाठी स्वतःला त्याने पूर्णपणे तयार देखील केले आहे.
दरम्यान, ग्रीनला जालेली ही दुखापत ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच महागात पडली. दुखापतीमुले ग्रीन नागपूर आणि दिल्ली कसोटीत खेळू शकला नाही आणि भारताने या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दारून पराभव केला. अशात तिसऱ्या सामन्यात ग्रीनच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल. (Cameron Green is fully fit for the third Test against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला प्रपोज करणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटरचा खळबळजनक खुलासा; म्हणाली, ‘मी तर…’
सचिनच्या ‘ऐतिहासिक’ वनडे द्विशतकाची 13 वर्ष! आजच्याच दिवशी केलेला कारनामा