इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये रविवारी (9 एप्रिल) डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातचा काळजीवाहू कर्णधार राशिद खान याने हॅट्रिक घेत सामना पालटला. आयपीएल इतिहासातील ही त्याची पहिली हॅट्रिक ठरली. तसेच, आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला कर्णधार ठरला.
.@rashidkhan_19 🤝 Hat-trick!
That was simply sensational! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/G8bESXjTyh#TATAIPL | #GTvKKR | @gujarat_titans pic.twitter.com/sSpYyFcO3S
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
धावांचा पाठलाग करताना केकेआरचे पहिले तीन फलंदाज केवळ 28 धावांवर बाद झालेले. त्यानंतर कर्णधार नितिश राणा व व्यंकटेश अय्यर यांनी केकेआरला सामन्यात पुनरागमन करून दिले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. राणाने 45 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने अय्यरने 40 चेंडूंवर 83 धावांचा तडाखा दिला.
आपल्या पहिल्या तीन षटकात तब्बल 35 धावा दिलेल्या राशिद खानने सतराव्या षटकात सामना पालटला. त्याने विस्फोटक आंद्रे रसेल, सुनील नरीन व मागील सामन्याचा नायक शार्दुल ठाकूर यांना सलग बाद करत हॅट्रिक पूर्ण केली. आयपीएल कारकिर्दीतील ही त्याची पहिली हॅट्रिक ठरली. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. याव्यतिरिक्त त्याच्या नावे बिग बॉस लीग व कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये देखील हॅट्रिक जमा आहे.
(Gujarat Titans Captain Rashid Khan Took Hattrick Against KKR)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: वानखेडेवर झाला ‘धोनी..धोनी’चा जयघोष, व्हिडिओ होतोय वेगाने व्हायरल
“मला माहितीच नव्हतं संघात घेतलंय, टॉसच्या दोन मिनिट आधी माही आणि फ्लेमिंगने सांगितलं तुला खेळायचंय”, रहाणेचा मोठा खुलासा