आयपीएल 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने 8 बाद 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेने 18.1 षटकात तीन विकेट्स गमावत विजय मिळवला. त्याचवेळी या सामन्यात चाहत्यांनी धोनीच्या नावाने जयघोष केलेला दिसून आला.
WE WANT DHONI ???????? pic.twitter.com/VgC3nHjOgA
— Abhishek (@MSDianAbhiii) April 8, 2023
या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी शानदार खेळ करत सामना 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी अखेरच्या काही धावा शिल्लक असताना चाहत्यांनी मैदानात धोनीच्या नावाचा जयघोष सुरू केला. त्यांनी ‘वी वॉंट धोनी’ अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अखेरच्या काही षटकात धोनी पॅड घालून तयार होता. मात्र, ऋतुराज व रायडू यांनी त्याला मैदानावर उतरू देण्याची तसदी घेऊ दिली नाही.
The chant at Wankhede Stadium for MS Dhoni. pic.twitter.com/vEpSQ92YAP
— Johns. (@CricCrazyJohns) April 9, 2023
या सामन्याचा विचार केल्यास चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा व ईशान किशन यांनी संघाला जोरदार सलामी दिली. तुषार देशपांडेने रोहितचा त्रिफळा उडवत संघाला पुनरागमन करून दिले. त्यानंतर मुंबईचे गडी नियमित अंतराने बाद झाले. जडेजा व सॅंटनर या फिरकी जोडीने मुंबईची वाताहात केली. टीम डेविडने अखेरीस केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईने 150 धावांची मजल मारली. विजयासाठी मिळालेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॉनवे पहिल्या षटकात बाद झाला. मात्र, त्यानंतर ऋतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे ही जोडी जमली. अजिंक्यने केवळ 19 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने 27 चेंडूवर 61 धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने 28 धावा करत चेन्नईचा विजय सोपा केला. अखेर ऋतुराज गायकवाड व रायुडू यांनी चेन्नईच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
(Wankhede Stadium Chanting We Want Dhoni Match Against MIvCSK In IPL 2023)