इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 22 एप्रिल) चाहत्यांना एका नाही, तर दोन सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. कारण, शनिवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स संघात, तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स संघात पार पडणार आहे. लखनऊ विरुद्ध गुजरात संघात आयपीएल 2023मधील 30वा सामना 3.30 वाजता खेळला जाणार आहे. यापूर्वी उभय संघात 3 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक गुजरात संघाने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने एक बदल केला आहे. अल्झारी जोसेफ संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी नूर अहमद ताफ्यात सामील झाला आहे. याव्यतिरिक्त लखनऊ संघातही बदल झाला आहे. संघात युद्धवीर सिंग प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी अमित मिश्रा याची एन्ट्री झाली आहे. (Gujarat Titans have won the toss and have opted to bat Lucknow Super Giants IPL 2023)
https://twitter.com/IPL/status/1649708913464590336
https://twitter.com/IPL/status/1649710449729077249
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, पुणे हादरलं
माझ्या रे नादाला लागू नको! लाईव्ह सामन्यात जडेजाची हैदराबादी खेळाडूला खुन्नस; धोनीने केले शांत, Video






