आयपीएलच्या 17व्या हंगामाला आता थोडेचं दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्वच जण उत्सुक असलेले पहायला मिळतं आहे. अशातच आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एक धक्का बसला आहे. तसेच गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. तर हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
याबरोबरच, आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. स्पर्धेपूर्वीच मोहम्मद शमी दुखपतीमुळे बाहेर पडला होता. त्यानंतर मॅथ्यू वेडनेही पहिल्या काही सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. तसेच गुजरात टायटन्सने आयपीएल मिनी लिलावता 3.60 कोटीची बोली लावत युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं होतं.
पण अपघातामुळे हा खेळाडू जखमी झाला आहे. त्याचं स्पर्धेत खेळणं आता कठीण असल्याचं समोर आलं आहे. 21 वर्षीय रॉबिन मिंज असं या खेळाडूचं नाव आहे. तसेच रॉबिन मिंजला आयपीएल 2024 लिलावात 3.60 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पण अपघातात जखमी झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितलं की, रॉबिन मिंज यावर्षी खेळण्याची शक्यता नाही. खूपच दुर्दैवी आहे आम्ही मिंजचा खेळाबाबत उत्सुक होतो.
Rookie Jharkhand cricketer Robin Minz, who recently met with a road accident, is all but ruled out of this edition of IPL, said GT head coach Ashish Nehra.
#IPL2024 pic.twitter.com/LWjY6cQESC
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2024
रॉबिन मिंज झारखंडसाठी अंडर 19 आणि अंडर 25 साठी खेळला आहे. रॉबिन मिंजसाठी चेन्नई आणि गुजरात टायटन्सने फिल्डिंग लावली होती. पण लिलावात गुजरातने बाजी मारली आणि आपल्या ताफ्यात घेतलं होतं. तसेच रॉबिन मिंज हा कावासाकी सुपरबाइक चालवत होता. त्यात समोरून येणाऱ्या बाइकने इतकी जोरदार धडक दिली. यामुळे बाइकचा पुढचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला होता. दरम्यान, रॉबिन मिंझ हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला आदिवासी खेळाडू आहे.
गुजरात टायटन्स संघ :
डेव्हिड मिलर, शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई केश , राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिंझ.
महत्वाच्या बातम्या –