---Advertisement---

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलला स्लो-ओव्हर रेटसाठी दंड, इतक्या रुपयांचा फाइन भरावा लागणार

On: बुधवार, मार्च 27, 2024 11:06 AM
Shubman Gill
---Advertisement---

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जकडून 63 धावांनी दारूण पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्सला आणखी एका नामुष्कीला सामोरं जावं लागलं. संघाचा कर्णधार शुबमन गिलला आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं स्लो-ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावला आहे. यासह स्लो ओव्हर-रेटसाठी दंड ठोठावण्यात आलेला गिल हा आयपीएल 2024 मध्ये पहिला कर्णधार ठरला आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईनं आपले आक्रमक इरादे सुरुवातीपासूनच स्पष्ट केले. डावखुऱ्या रचिन रवींद्रनं पहिल्या सामन्यातील आरसीबीविरुद्धच्या शानदार खेळीनंतर या सामन्यातही आपल्या फलंदाजीनं टोन सेट केला. त्यानं 20 चेंडूत 46 धावा ठोकल्या.

गुरातनं पहिल्याच षटकात स्लिपमध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडचा झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळालं. याचा पुरेपुर फायदा घेत ऋतुराजनं चांगली फटकेबाजी केली. तो 36 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. चेन्नईकडून शिवम दुबेनं स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 23 चेंडूत 51 धावांची जलद खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये समीर रिझवीनं केलेल्या दमदार फलंदाजीमुळे सीएसके मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खाननं 4 षटकात 49 धावा देत 2 बळी घेतले.

गुजरातला 207 धावांचं मोठं लक्ष्य पेलवलं नाही. संघ निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 143 धावा करू शकला. गुजरातकडून साई सुदर्शननं 31 चेंडूत सर्वाधिक 37 धावा केल्या. तर यष्टीरक्षक वृद्धीमान साहानं 17 चेंडूत 21 आणि डेव्हिड मिलरनं 16 चेंडूत 21 धावांचं योगदान दिलं. गुजरातचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अशाप्रकारे चेन्नईनं गुजरातवर 63 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नईकडून दीपक चहर, मुस्तफिजूर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

आता चेन्नईचा पुढील सामना 31 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाईल. तर गुजरात टायटन्स आपला पुढील सामना 31 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध अहमदाबादमध्ये खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीसमोर ऋतुराज फक्त रिमोट कंट्रोल कर्णधार? दीपक चहरनंही घेतली मजा

पहिल्याच चेंडूवर षटकार, राशिद खानलाही चोपलं! चेन्नईच्या 8.4 कोटींच्या खेळाडूची फलंदाजी पाहून धोनीही हैराण

टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---