इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २४वा सामना गुरुवारी (दि. १४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात गुजरात संघाने ३७ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील चौथा विजय होता. दुसरीकडे राजस्थान संघाचा हा हंगामातील तिसरा पराभव होता. गुजरातने या विजयासह गुणतालिकेत थेट अव्वल क्रमांक मिळवला. गुजरातच्या या विजयाचा शिल्पकार हार्दिक पंड्या, पदार्पणवीर यश दयाल आणि लॉकी फर्ग्यूसन ठरले. पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान (Rajasthan Royals) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, फलंदाजीसाठी गुजरात (Gujarat Titans) संघाला आमंत्रित केले होते. यावेळी गुजरात संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १९२ धावा केल्या. गुजरातच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १५५ धावाच करता आल्या.
राजस्थानकडून जोस बटलरने (Jos Buttler) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २४ चेंडूत ५४ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ८ चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त शिमरॉन हेटमायरने २९ धावा केल्या. या दोन खेळाडूंशिवाय इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. इतकेच नाही, तर कर्णधार संजू सॅमसनला फक्त ११ धावाच करता आल्या, तर युवा विस्फोटक फलंदाज देवदत्त पडिक्कल शून्य धावेवर तंबूत परतला.
That's that from Match 24.@gujarat_titans win by 37 runs and now sit atop the #TATAIPL Points Table.
Scorecard – https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/tyce9OyqJa
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना पदार्पणवीर यश दयाल आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. दयालने ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत ३ विकेट्स खिशात घातल्या. तसेच, फर्ग्यूसनने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि कर्णधार हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
तत्पूर्वी प्रथम फंलदाजी करताना गुजरात संघाकडून कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने ४ षटकार आणि ८ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त अभिनव मनोहरने ४३ धावांचे योगदान दिले. तसेच, डेविड मिलरने ३१, युवा फलंदाज शुबमन गिलने १३ आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने १२ धावांचे योगदान दिले.
यावेळी राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना रियान पराग, युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेन या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
गुणतालिकेत गुजरात अव्वलस्थानी
या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांतील ४ सामन्यात विजय, तर १ सामन्यात पराभव मिळवला. यासह ते ८ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे, राजस्थान संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला. राजस्थानचे ६ गुण आहेत. त्यांनी ५पैकी ३ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभव पत्करला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावं तेवढं कमीच! ३ षटकार अन् ८ चौकारांसह बटलरची वेगवान फिफ्टी, पटकावला ‘हा’ क्रमांक