(IPL 2025) यंदाच्या आयपीएल हंगामातील पाचवा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात एका बाजूला शुबमन गिल आणि दुसरीकडे श्रेयस अय्यर आहे. श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्ज संघाची धुरा आहे, तसेच गुजरातचे नेतृत्व शुबमन गिल करत आहे. भारतीय संघाच्या भविष्यातील दोन कर्णधार आमने सामने आहेत. या सामन्यात शुबमन गिलने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हंगामातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
पंजाब – प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्लाह उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
गुजरात – शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधरसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघामध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 सामने खेळण्यात आले आहेत. यादरम्यान तीन सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तसेच 2 वेळा पंजाब किंग्स संघ विजयी झाला आहे. तसेच मागच्या हंगामात पंजाबने अहमदाबाद मध्ये गुजरातला पराभूत केले होते.






