---Advertisement---

GT vs SRH : हैदराबादचा शानदार पराभव करत गुजरातने 7 विकेट्सने सामना जिंकला

On: रविवार, एप्रिल 6, 2025 11:09 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 19 वा सामना खेळला जात गेला. हा सामना गुजरात टायटन्सने हैदराबाद वर 7 विकेट्सने जिंकला. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. 20 चेंडू शिल्लक असताना गुजरातने विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 152 धावा केल्या.

गुजरातसाठी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा कर्णधार शुबमन गिलने केल्या. त्याने 43 चेंडूत 61 धावांची शानदार पारी खेळली. त्याने 9 चौकार झळकावले. तसेच वॉशिंग्टन सुंदरने 29 चेंडूत 49 धावा केल्या. हैदराबादसाठी 2 विकेट मोहम्मद शमीने घेतल्या.

हैदराबादसाठी प्रथम फलंदाजी करताना कोणताही फलंदाज सर्वाधिक धावा करू शकला नाही. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने 18 धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेड अवघ्या 8 धावांवर बाद झाला. तसेच ईशान किशन प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तो सुद्धा 17 धावांवर बाद झाला. तसेच बाकीच्या फलंदाजांमध्ये संघासाठी नितीश कुमार रेड्डीने 31 धावा, क्लासेन 27 धावा, कर्णधार पॅट कमिन्सने 22 धावा केल्या.

गुजरातसाठी सर्वोत्तम गोलंदाजी मोहम्मद सिराजने केली त्याने चार षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने मागच्या सामन्यात देखील तीन विकेट्स पटकावल्या होत्या. तसेच प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट्स घेतल्या. याचबरोबर साई किशोरने दोन विकेट्स पटकावल्या. उद्या स्पर्धेतील 20 वा सामना आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---