---Advertisement---

परदीपची कमाल! पिछाडीवरून यूपीने साधली गुजरातविरुद्ध बरोबरी

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 9:37 PM
gujrat v up
---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१ मधील आठवा दिवशीच्या दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धा व गुजरात जायंट्स हे संघ बेंगलोर येथे भिडले. आपल्या दमदार रेडरसाठी ओळखल्या जाणाऱ्या यूपीसमोर भक्कम बचाव असलेल्या गुजरातने कडवे आव्हान निर्माण केले. क्षणाक्षणाला पारडे बदलत असलेल्या या सामन्यात ३२-३२ अशी बरोबरी साधली गेली.

सामन्याची सुरुवात दोन्ही संघांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक केले. गुजरातसाठी राकेश नरवाल तर यूपीसाठी सुरींदर गिलने गुण घेण्याची सुरुवात केली. मात्र, दहा मिनिटातच गुजरातने यूपी संघाला ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यंतराला गुजरात संघाकडे ६ गुणांची आघाडी होती.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच यूपीने जोरदार आक्रमण केले. परदीप नरवाल याने सलग गुण मिळवत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सामना सातत्याने दोलायमान स्थितीत राहिला. मात्र, अखेरीस सामना बरोबरीत सुटला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---