गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पाहुण्यांनी ८ विकेट्सने आपल्या नावे केला; तर दुसऱ्या सामन्यात यजमानांनी ७ विकेट्सने विजयी पताका झळकावली. यासह ही टी२० मालिका सध्या १-१ ने बरोबरीवर आली आहे. यानंतर सर्वांचे लक्ष येत्या तिसऱ्या टी२० सामन्यावर लागले आहे. अशात एका व्यक्तीने अहमदाबाद पोलिसांना ही मालिका रद्द करण्याची धमकी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता जर भारत-इंग्लंड टी२० मालिका रद्द झाली नाही; तर आत्महत्या करणार असल्याचे त्या युवकाने सांगितले आहे. त्यामुळे अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, गुजरातमधील एका अज्ञात व्यक्तीने तिसऱ्या टी२० सामन्यापुर्वी चांदखेडा पोलिस ठाण्यात फोन केला. अहमदाबादमध्ये चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेत दर्शकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. कोणीही कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे ही मालिका रद्द न केल्यास मी स्वत:ला जाळ लावून जिंवत मरेल अशी धमकी त्याने फोनवर दिली.
यानंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंगच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध लावला आहे. त्यांची रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
देशभरात गेले काही महिने उतरणीला लागलेला कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात देशात एकूण २५,३२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. अशा परिस्थितीत ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती देखील धोक्याला आमंत्रण देणारी ठरली असती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीसीसीआयने उर्वरित टी२० सामने दर्शकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
अरे बापरे! इशान किशनच्या पदार्पणाच्या दिवशी गर्लफ्रेंडने केलं असं काही, पाहून वाटेल आश्चर्य
सूर्यकुमार-इशान नंतर ‘हा’ युवा धुरंधर गाजवणार क्रिकेटचं मैदान, तिसऱ्या टी२०त मिळणार संधी?
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’