भारत-इंग्लंड टी२० मालिकेतील दुसरा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय खास राहिला. या सामन्याद्वारे युवा भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडला ७ विकेट्सने पराभवाची धूळ चारत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. यानंतर गुरुवार (१६ मार्च) रोजी मालिकेतील तिसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात अजून एका नव्या शिलेदाराला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
इंग्लंडविरुद्धची टी२० मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२१ ची तयारी करत आहे. त्यामुळे या टी२० सामन्यांद्वारे अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनाही आजमावण्यात येणार आहे. जेणेकरुन संघ बांधणीसाठी मदत होईल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी२० मालिकेपुर्वी सांगितले होते.
त्यामुळे २७ वर्षीय अष्टपैलू राहुल तेवतियाला तिसऱ्या टी२० सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला विश्रांती देत तेवतियाची अंतिम ११ जणांच्या पथकात निवड केली जाऊ शकते.
तेवतिया डावखुरा फलंदाज असून फिरकी गोलंदाजीही करु शकतो. आयपीएल २०२० मधील अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने एकूण १४ सामने खेळले होते. यात त्याने एका अर्धशतकासह २५५ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना १० विकेट्स चटकावल्या होत्या. त्याने शेल्डन कॉट्रेलच्या षटकात मारलेले ५ षटकार कोणताही आयपीएल प्रेमी विसरू शकला नाही.
अशात भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या टी२० सामन्यात तेवतियाला संधी देतो का नाही?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! इशान किशनच्या पदार्पणाच्या दिवशी गर्लफ्रेंडने केलं असं काही, पाहून वाटेल आश्चर्य
ही कसली दुविधा! तिसऱ्या टी२० सामन्यात रोहितला संधी दिल्यास भारताचं ‘मोठं नुकसान’, पाहा कसं