---Advertisement---

अखेर दयालच्या पदरात पडले ‘यश’! गुजरातला चॅम्पियन बनवणारा गोलंदाज टीम इंडियात

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 10:39 PM
Yash-Dayal
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी20 विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाला न्यूझीलंड दौरा करायचा आहे. तसेच डिसेंबर महिन्यात भारत वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला जाईल. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) या दोन्ही दौऱ्यांसाठी एकूण चार संघ घोषित केले आहेत. यातील बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज यश दयालला संधी देण्यात आली आहे. तो प्रथमच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमचा भाग बनेल.

यश दयाल हा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज आयपीएल 2022 च्या लिलावावेळी सर्वांच्या नजरेत आला होता. मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यासारख्या संघांना पछाडत गुजरात टायटन्सने त्याला तब्बल तीन कोटी वीस लाखांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल मध्ये पदार्पण करताना त्याने पहिल्याच सामन्यात तीन बळी घेतलेले. त्याने गुजरात टायटन्सला  विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावताना 9 सामन्यात 11 बळी मिळवलेले. टी20 क्रिकेटमध्ये उपयोगी ठरणाऱ्या स्लोअर वन तसेच बाउन्सरचा तो योग्य वापर करताना दिसतो. ‌‌‌

उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशने 2018 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 58, 14 लिस्ट ए सामन्यात 23 तर 30 टी20 मध्ये 29 बळी मिळवले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---