---Advertisement---

बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 8:24 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयने सोमवारी (दि. 31 ऑक्टोबर) मोठी घोषणा करत सर्वत्र एकच खळबळ माजवली. बीसीसीआयने घोषणा करत सांगितले की, भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच, भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या चारही मालिकांमधून भारताचा अनुभवी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज बाहेर आहे.

जसप्रीत बुमराह चारही मालिकांमधून बाहेर
या चारही मालिकेतून बाहेर असणारा खेळाडू इतर कुणी नसून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतही खेळता आले नाही. आता आगामी मालिकांमध्येही बुमराह खेळताना दिसणार नसल्याने त्याची कमतरता भारतीय संघाला जाणवू शकते.

मालिका चार, कर्णधार तीन
याव्यतिरिक्त या चार मालिकांसाठी 3 कर्णधारांची निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेचे कर्णधारपद हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवले आहे. तसेच, वनडे मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवन याच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, बांगलादेश दौऱ्यातील वनडे आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेसाठी दोन संघांची निवड, दोन महत्त्वाच्या खेळाडूंना डच्चू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---