इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात नव्याने तयार झालेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएलचा किताब आपल्या नावे केला. आपल्या पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकणाऱ्या संघांच्या यादीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी आयपीएलच्या पहिल्या हंगामात आयपीएल किताब जिंकण्याचा विक्रम केवळ राजस्थानच्या नावे होता. यंदाच्या वर्षी गुजरातचा संघ आयपीएल विजेता ठरला असला, तरी संघातील काही खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक होते. त्यामुळे त्यांना पुढच्या वर्षी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो.
१. प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan)
गुजरातच्या संघात आधीच मोहम्मद शामी आणि लॉकी फर्ग्युसनसारखे जलद गतीचे गोलंदाज आहेत. शिवाय कर्णधार हार्दिक पंड्या गरज असेल, तेव्हा गोलंदाजी करत आला आहे. त्यामुळे यंदा जास्त सामन्यात प्रदीपला संघात खेळता आले नाही. प्रदीपने यंदा केवळ ३ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३ बळी आपल्या नावे केल्या. त्यामुळे पुढीलवर्षी गुजरात प्रदीपला संघाबाहेर करू शकेल.
२. वरुण ऍरॉन (Varun Aaron)
जी गणिते प्रदीप सांगवान साठी आहेत तेच सगळे वरुनला लागू होतात. आधीच संघाकडे जलद गेलंदाजीत धार उपलब्ध आहे. त्यामुळे जास्त वेळा वरुनची गरज भासत नाही. यंदा वरुनने केवळ तीन सामने खेळत ३ बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत वरुनला संघाबाहेर करत गुजरात आणखी चांगल्या खेळाडूवर विश्वास टाकू शकते.
३. जयंत यादव (Jayant Yadav)
आपल्या फिरकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जयंत यादवला यंदा गुजरातच्या संघाकडून एकही सामना खेळता आला नाही. यामागे प्रमुख कारण होते राशिद खान. संघात राशिदसारखा फिरकीपटू असताना दुसऱ्या गोलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पुढील वर्षी जयंत गुजरातच्या संघात दिसला नाही, तर आश्चर्य वाटायला नको.
४. विजय शंकर (Vijay Shankar)
विजय शंकर हा एक अष्टपैलू खेळाडू असला, तरी त्याचा खेळ जवळपास कर्णधार हार्दिक पंड्या सारखाच आहे. फलंदाजीत चमक असणारा विजय वेळप्रसंगी संघासाठी गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. मात्र, त्याच्याप्रमाणेच खेळी करू शकणारा खेळाडू संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे विजयला जास्त संधी मिळू शकत नाही. यंदाच्या हंगामातदेखील विजयला केवळ ४ सामन्यात संधी मिळाली. ज्यात विजयने केवळ १९ धावा बनवल्या आहेत.
५. मॅथ्यू वेड (Mathew Wade)
यष्टीरक्षक म्हणून संघात घेण्यात आलेल्या मॅथ्यू वेड याने यंदाच्या हंगामात फारसे प्रभावित केले नाही. वेडने १० सामन्यांत केवळ १६च्या सरासरीने १५७ धावा बनवल्या आहेत. अशातच आता संघाकडे वृद्धिमान साहासारखा यष्टीरक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे संघ वेडच्या बाबतीत कठोर निर्णय घेऊ शकतो.
दरम्यान, या पाचही खेळाडूंना पुढल्या आयपीएल लिलावात बाहेर काढत गुजरातचा संघ आणखी बळकटी मिळवू शकतो. त्यासाठी त्यांना आणखी नवीन खेळाडूंना संधी देणे महत्तवाचे असेल.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सचिनने निवडली आयपीएल २०२२ची बेस्ट इलेव्हन; धोनी, विराट, रोहितला वगळले, मग कर्णधारपदी कोण?
वेस्ट इंडिजचा दिग्गज काळाच्या पडद्याआड, भारताविरुद्ध एका कसोटी डावात घेतल्या होत्या ५ विकेट्स
चुना लगा दिया! गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपद राजीनामाच्या प्रँकनंतर चाहत्यांकडून मीम्सची बरसात






