---Advertisement---

दुखापतीमुळे गेला लंगडत, सामना जिंकताच आला धावत! गुलबदीन नाईबचा व्हिडिओ व्हायरल

On: मंगळवार, जून 25, 2024 3:22 PM
Afghanistan Team
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 52वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यामध्ये खेळला गेला. अर्नोस वाले स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्ताननं 8 धावांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला आणि या टी20 विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलसाठी पात्र ठरले. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज गुलबदीन नाईब (Gulbadin Naib) अचानक हॅमस्ट्रिंग स्ट्रेचमुळे मैदानातून बाहेर गेला.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत चालू होती. परंतु पावसानं या सामन्यात खोळंबा घातला आणि या सामन्याच्या ओव्हर, धावा कमी केल्या गेल्या. अफगाणिस्ताननं बांगलादेश संघाला 11.4 षटकात 81 धावा दिल्या होत्या आणि त्यांचे 7 गडी बाद केले होते. परंतू या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्राॅट यांनी संघाला इशारा केला. गुलबदीन नाईब क्षेत्ररक्षणासाठी स्लीपला थांबला होता आणि अचानक दुखापतीचं नाटक करुन खाली पडला.

 

गुलबदीन नाईब सामन्यादरम्यान सकाळी 10:01 वाजता दुखापतीमुळे बाहेर गेला होता. परंतू अफगाणिस्ताननं 10:34 वाजता सामना जिंकला तसा तो अतिशय वेगानं मैदानात धावत आला आणि सामना जिंकल्याचा आनंद साजरा करु लागला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नाईबनं या सामन्यामध्ये खोळंबा घालण्यासाठी नाटक केल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.

अफगानिस्ताननं दिलेल्या 116 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ सर्वबाद केवळ 105 धवाचं करु शकला आणि अफगाणिस्ताननं या सामन्यावर वर्चस्व गाजवत सेमीफायनलसाठी क्वालिफाय केलं. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तान संघ राशिद खानच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलसाठी क्वालिफाय ठरला. अफगाणिस्ताननं यंदाच्या टी20 विश्वचषकात 5 सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान सेमीफायनलसाठी (27 जून) रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती!
राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी
अक्षर पटेलला मिळालं सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक, अशक्य झेल झेलून दिली होती सामन्याला कलाटणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---