सध्या इंग्लंमध्ये सुरू असेलल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व खरणाऱ्या खेळाडूंचे चांगले प्रदर्शन कायम आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) स्पर्धेचा सहावा दिवस पार पडला. भारतासाठी वेटलिफ्टर गुरदीप सिंग याने पुरुषांच्या १०९ किलोपेक्षा जास्त वजनी गटात कांस्य पदक पटकावले. आता वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला मिळालेल्या पदकांची संख्या दोन आकडी झाली आहे.
यावर्षी कॉमनवेल्थ गेम्सचा २२ वा हंगाम खेळला जात आहे. बर्मिंघममध्ये आयोजित या स्पर्धेत भारतीय संघाचे खेळाडू चमदार कामगिरी करत आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने एकूण ५ पदके जिंकली. गुरदीप सिंग (Gurdeep Singh) सहाव्या दिवशी भारतासाठी शेवटचे पदक जिंकणारा खेळाडू होता. त्याने वेटलिफ्टिंगच्या १०९ पेक्षा जास्त वजनी गटात ३९० किलो वजन उचलले आणि कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
गुरदीप स्नॅच फेरीच्या सुरुवातीला १६७ किलो वजन उचलू शकला नव्हता. मात्र स्नॅचच्या दुसऱ्या प्रयत्नात तो १६७ किलो वजन उचलले. त्यानंतर तिसऱ्या फेरीत १७३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण अपयशी ठरला. क्लीन एंड जर्क फेरीची सुरुवात त्याने २०७ किलो वजन उचलून केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याला २१५ किलो वजन उचलता आले नाही. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात त्याने २२३ किलो वजन उचलले. त्याने एकूण एकूण ३९० कोलो वजन उचललून कांस्य पदक नावावर केले.
गुरदीपच्या या पदकानंतर कॉमनवेल्थ गेम्सच्या चालू हंगामात भारताने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलेल्या पदकांची संख्या दोन आकडी झाली आहे. भारताने आता वेटलिफ्टिंमध्ये आतापर्यंत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि ४ कांस्य पदक नावावर केली आहेत. बुधवारी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दोन पदक मिळाले. लवप्रीत सिंगने पुरुषांच्या १०९ किलो वजनी गटात कांस्य पदक जिकंले, तर गुरदीप १०९ किलोपेक्षा जास्त वजनी गटात कांस्य पदक विजेता ठरला. पाकिस्तानचा मोहम्मद नूह दस्तीगार या स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता ठरला. तर रौप्य पदकाचा मानकरी डेविड एंड्र्रर्यू लिटी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तुलिका मानने ज्यूडोमध्ये भारताला मिळवून दिले सिल्वर मेडल, वाचा तिचा कॉमनवेल्थमधील प्रवास
WIvsIND: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! शेवटच्या सामन्यांवर निघाला तोडगा
कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॉश एकेरीत भारताचे पहिले पदक! सौरव घोषालची ऐतिहासिक कामगिरी