भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी शुक्रवारी (10 नोव्हेंबर) समोर आली. अवघ्या 33व्या वर्षी भारतीय संघाच्या एका क्रिकेटपटूने सर्व क्रिकेट प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये या खेळाडूने चार वेगवेगळ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघासाठी तीन वनडे सामने खेळमाऱ्या गुरकीरत सिंग मान (Gurkeerat Singh Mann) याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. भारतासाठी खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने 13 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजाच्या रुपात 60 चेंडू टाकले आणि 68 धावा खर्च केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली नाहीये. किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या चार आयपीएल फ्रँचायझींकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे.
https://www.instagram.com/p/CzdgIw2tqgZ/?utm_source=ig_web_copy_link
(Gurkeerat Singh Mann retires from all cricket)
महत्वाच्या बातम्या –
ओमरझाईची 97 धावांची एकाकी झुंज! अफगाणिस्तानचे दक्षिण आफ्रिकेसमोर 245 धावांचे आव्हान
बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record