भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची निवड झाली आहे. त्याचबरोबर बांगलादेशनेही अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. बांगलादेशकडे एक उंच वेगवान गोलंदाज नाहिद राणा आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक खास योजना आखली असून तितक्याच उंच वेगवान गोलंदाजाला टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये बोलावले आहे.
गुरनूर ब्रार आयपीएलचा भाग आहे
कसोटी मालिकेत नाहिद राणा टीम इंडियासाठी मोठे आव्हान बनू शकते. यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खास योजना आखली आहे. भारतीय फलंदाजांना पुरेसा सराव मिळावा यासाठी त्यांनी नाहिद राणासारख्या उंच वेगवान गोलंदाजाला टीम इंडियाच्या सराव शिबिरात आमंत्रित केले आहे. गुरनूर ब्रार असे या वेगवान गोलंदाजाचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.
त्याने आतापर्यंत एकूण पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि तो आयपीएलचाही भाग आहे. गुरनूरची खास गोष्ट म्हणजे तो 6 फूट 4.5 इंच उंच वेगवान गोलंदाज आहे. भारताचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलही त्याच्याला गोलंदाजीचे मार्गदर्शन देताना दिसले आहेत.
पाकिस्तानी फलंदाजांना नाहिद राणाने फोडलाय घाम
नाहिद राणाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी चांगली झाली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाहिद राणाने शानदार गोलंदाजी केली होती. ताशी 150 किलोमीटरचा वेगाने गोलंदाजी करत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना घाम फोडला होता. एकंदरीत नाहिद राणाने 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. याच कारणामुळे नाहिद राणाची खूप चर्चा होत आहे. नाहिद राणाची खास गोष्ट म्हणजे तो खूप उंच आहे आणि त्यामुळेच त्याला गोलंदाजी करताना खूप चांगली उसळी मिळते.
महत्त्वाच्या बातम्या-
रियान पराग किंवा हार्दिक पांड्या नव्हे तर ‘हा’ भारतीय क्रिकेटर आहे अनन्या पांडेचा क्रश
पाकिस्तानला मोठा दिलासा! फाॅर्ममध्ये परतला ‘हा’ स्टार फलंदाज
“माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहेस तू”, वाढदिवशी पत्नी देविशाकडून सूर्यकुमारला प्रेमळ शुभेच्छा