Suryakumar Yadav Birthday :– भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आज (14 सप्टेंबर) 34 वर्षांचा झाला. या खास प्रसंगी सूर्याला चाहते आणि दिग्गज खेळाडूंकडून शुभेच्छा मिळत आहेत. सूर्याने टी20 क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, या फॉरमॅटमध्ये त्याने भारतीय संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्यानंतर आता त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) हिने त्याच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
सूर्यकुमार यादवची पत्नी देविशाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. देविशाने इंस्टाग्रामवर सूर्यकुमारसोबतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये आपल्या मनातील शब्दही लिहिले. देविशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा जिवलग मित्र, पती, प्रेम, माझे जग आणि माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मी कृतज्ञ आहे. तू हे जग एक चांगले स्थान बनवले आहेस आणि तुझ्याशिवाय मी काय करेल हे मला माहीत नाही. आता आणि नेहमी तुझ्यावर प्रेम करते.’
भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वोत्तम टी20 फलंदाज मानला जातो. त्याच्या नावावर टी20 मध्ये चार शतके आहेत. सूर्याने आतापर्यंत 71 सामन्यांच्या 68 डावांमध्ये चार शतके ठोकली आहेत. त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावावर पाच शतके आहेत.
View this post on Instagram
जून महिन्यात झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात डेव्हिड मिलरचा अशक्यप्राय झेल घेत सूर्यकुमार 140 कोटी भारतीयांसाठी हिरो बनलेला. त्याने हा झेल सीमारेषेवर घेतला. त्याच्या या झेलामूळे भारतीय संघाला विश्वचषकही जिंकता आला. सूर्यकुमारचा हा झेल क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल मानला जात आहे. त्यानंतर भारतीय संघाचा पूर्णवेळ टी20 कर्णधार बनल्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात यश मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार
“भारतीय गोलंदाज इतरांपेक्षा वेगळे…” नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य