भारतीय संघ घरच्या मैदानावर (19 सप्टेंबर) पासून बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि नवा गोलंदाजी प्रशिक्षक माॅर्ने माॅर्केलच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाने भारतीय गोलंदाजांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मार्ने माॅर्केल (Morne Morkel) म्हणाला, “खेळाडू, त्यांची ताकद, त्यांची कमकुवतता समजून घेऊन आगामी मालिकेसाठी लक्ष्य निश्चित करणे हा आजचा उद्देश होता. खेळाडूंनी खरोखरच चांगली कामगिरी केली. ते किती मजबूत होते ते कसे काम करतात, हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यामुळे हे एक चांगले लक्षण आहे आणि आशा आहे की आम्ही त्यावर अधिक काम करू शिकू.”
पुढे बोलताना माॅर्ने माॅर्केल म्हणाला, “खेळाडूंकडे प्रतिभा आणि कौशल्य असणे ही एक गोष्ट आहे, परंतु सर्वप्रथम आपण खेळाडूंना आव्हानात्मक वातावरणात दाखवून त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, कारण भारताकडून खेळताना आणि निळी जर्सी परिधान करताना त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात.”
दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना (23 सप्टेंबर) पासून चेन्नईत आणि दुसरा कसोटी सामना (27 सप्टेंबर) पासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन्ही सामने चालू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलचा भाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी, महिन्याभरापूर्वीच झाली होती नियुक्ती
“धोनीने लाथ मारली…” ‘या’ खेळाडूने सांगितली आयपीएलमधील आतली गोष्ट
नीरज चोप्रा आज पुन्हा ॲक्शनमध्ये! भालाफेकीचा अंतिम सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या