सध्या दुलीप ट्राॅफीमधील (Duleep Trophy) दुसरे राउंड खेळले जात आहेत. या स्पर्धेत अनेक युवा भारतीय खेळाडू त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. यामध्ये भारताचा स्टार खेळाडू सरफराज खानचा भाऊ मुशीर खान (Musheer Khan), तिलक वर्मा (Tilak Verma) यांचादेखील समावेश आहे. तत्पूर्वी आता आणखी एक नवा उगवता तारा आला आहे, ज्याने इंडिया-बी आणि इंडिया-सी यांच्यातील सामन्यादरम्यान गोलंदाजीने कहर केला आहे.
इंडिया-बी आणि इंडिया-सी सामन्यादरम्यान अंशुल कंबोज (Anshul Kamboj) या 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने रिंकू सिंह (Rinku Singh) आणि सरफराज खानसारख्या फलंदाजांना गार केले. रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली इंडिया-सी संघाकडून खेळताना या गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली.
अंशुल कंबोजने (Anshul Kamboj) ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम-बी येथे तिसऱ्या दिवशी इंडिया-बी विरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने एकापाठोपाठ एक पाच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळी पडलेल्या सर्व विकेट्स अंशुलने घेतल्या. त्याने मुशीर खान, सरफराज खान, रिंकू सिंग, नितीश रेड्डी आणि नारायण जगदीसन या फलंदाजांना तंबूत पाठवले.
कोण आहे अंशुल कंबोज?
मूळचा हरियाणाचा असलेल्या 23 वर्षीय अंशुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 सामने खेळले आणि 38.14च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत. अंशुलने 2022 मध्ये हरियाणाकडून त्रिपुरा विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आयपीएल (IPL 2024) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने पहिला आयपीएल सामना खेळला. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबईकडून पदार्पण केले आणि स्टार भारतीय फलंदाज मयंक अग्रवालची विकेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतीय गोलंदाज इतरांपेक्षा वेगळे…” नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
भारताच्या माजी क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी, महिन्याभरापूर्वीच झाली होती नियुक्ती
“धोनीने लाथ मारली…” ‘या’ खेळाडूने सांगितली आयपीएलमधील आतली गोष्ट