---Advertisement---

“गौतम गंभीरची बोलण्याची पद्धत योग्य नाही, त्याला मीडियापासून दूर ठेवा”, संजय मांजरेकरांचा बीसीसीआयला सल्ला

---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर जोरदार निशाणा साधला आहे. गंभीरला माध्यमांशी बोलण्याचा शिष्टाचार नसल्याचं मांजरेकर म्हणाले. सोशल मीडियावर तिखट शब्दात लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मांजरेकर यांनी बीसीसीआयकडे गंभीरला पत्रकार परिषदांपासून दूर ठेवण्याची विनंती केली. भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरनं सोमवारी (11 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली होती.

संजय मांजरेकर यांनी X वर लिहिले, “मी नुकतेच गंभीरला पत्रकार परिषदेत पाहिले. त्याला अशा कामापासून दूर ठेवणं आणि पडद्यमागे काम करू देणं हेच बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्याची बोलण्याची पद्धत आणि शब्द योग्य नाहीत. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यासाठी योग्य आहेत.”

 

गौतम गंभीरनं पत्रकार परिषदेत अनेक कठीण प्रश्नांना आत्मविश्वासानं आणि स्पष्टपणे उत्तरं दिली. विराट कोहलीवर टीका करणाऱ्या रिकी पाँटिंगवर त्यानं निशाणा साधला. शार्दुल ठाकूर ऐवजी नितीश रेड्डी याची निवड करण्याच्या निर्णयाचाही त्यानं बचाव केला. याशिवाय, नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध असल्यास, उपकर्णधार जसप्रीत बुमराह पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व करेल याची पुष्टी गंभीरनं केली.

भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियानं मागील 2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करत मालिका जिंकली होती. मात्र, यावेळी भारतीय संघाचा मार्ग सोपा नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडियाला या मालिकेतील कमीत कमी 4 सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा – 

काय सांगता! माजी भारतीय क्रिकेटपटूचा मुलगा लिंग बदलून मुलगी झाला
वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---