जो रूट (Joe Root) आणि गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) यांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर लॉर्ड्सच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध (ENG vs SL) झालेला दुसरा कसोटी सामना इंग्लंडने 190 धावांनी जिंकला. 483 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ चौथ्या दिवशी केवळ 292 धावाच करू शकला. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर शेवटच्या डावात 5 विकेट्स घेतले. यासह इंग्लंडने लॉर्ड्सवर इतिहास रचला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 427 धावांवर सर्वबाद झाला होता. इंग्लंडकडून पहिल्या डावात जो रूटने 18 चौकारांच्या मदतीने 143 धावांची शानदार खेळी केली होती. तसेच गस ऍटकिन्सनच्या शतकी खेळीचाही यात समावेश होता. 4 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने ऍटकिन्सनने 118 धावांची खेळी केली होती. या डावात श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने विकेट्सचा पंचक घेतला होता.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 196 धावांवर सर्वबाद झाला होता. श्रीलंकेकडून या डावात कामिंदू मेंडिसने 74 धावांची बचावात्मक खेळी खेळली होती. परिणामी इंग्लंडने पहिल्या डावात 231 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात श्रीलंकेने इंग्लंडला 251 धावांवर रोखले. या डावातही रूटने शतकी तडाखा लावला होता. या खेळीदरम्यान त्याने 10 चौकारही मारले होते. या खेळीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र गस ऍटकिन्सनने केवळ 62 धावा देत श्रीलंकेचे 5 फलंदाज बाद केले आणि श्रीलंकेच्या संघाला 292 धावांवरच रोखले. परिणामी इंग्लंडचा संघ 190 धावांनी विजयी झाला.
HISTORY AT LORD’S…!!!!
– England has defeated Sri Lanka for the first time in a Test at London after 33 years. 🤯 pic.twitter.com/REj3E7GKa1
— Johns. (@CricCrazyJohns) September 1, 2024
या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिके 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच इंग्लंडचा हा लॉर्ड्सच्या मैदानावरील श्रीलंकेविरुद्धचा ऐतिहासिक विजयही ठरला. कारण तब्बल 33 वर्षांनंतर इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर श्रीलंकेला पराभूत केले आहे.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!