न्यूझीलंड विरुद्ध खेळत असलेला कसोटी सामना हा त्याच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 55 वा कसोटी सामना आहे. त्याने आत्तापर्यंत 55 कसोटी सामन्यात 104 डाव खेळताना 37.95 च्या सरासरीने 3644 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 10 शतकांचा आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर त्याने 76 डावात गोलंदाजी करताना 34.05 च्या सरासरीने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. हाफिजने 20-24 आॅगस्ट 2003 दरम्यान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यातून कराची येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मात्र त्याच्यासाठी सध्या सुरु असलेली पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका खास ठरलेली नाही त्याला या मालिकेत 4 डावात 9.75 च्या सरासरीने फक्त 39 धावा करता आल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही तो पहिल्या डावात शून्य धावेवर बाद झाला आहे. तसेच त्याला या मालिकेत विकेटही घेता आलेली नाही.
त्याच्या या निर्णयाबद्दल हाफिज म्हणाला, ‘मला वाटते वेळ आली आहे. मी कसोटी क्रिकेटमधून माझी निवृत्ती घोषित करत आहे. मला आनंद आहे की मी माझ्या कारकिर्दीत चांगले कष्ट केले.’
महत्त्वाच्या बातम्या-
–डुबकी किंग परदीप नरवालला प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी
–२०१९च्या आयपीएलपासून दिल्ली डेयरडेविल्स ओळखले जाणार या नवीन नावाने