आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकात सामील होण्याऱ्या देशांनी यापूर्वीच त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. आयसीसीच्या नियमांप्रमाणे जर संघात काही बदल करायचा असेल, तर तो १० ऑक्टोबरपूर्वी करता येणार आहे. अशात पाकिस्तानने शनिवारी (९ ऑक्टोबरला) त्यांच्या विश्वचषकाच्या संघात काही महत्वाचे बदल केले आहेत.
संघात झालेले तीन मोठे बदल
पाकिस्तान क्रिकेट संघात तीन मोठे बदल केले गेले आहेत. यामध्ये हैदर अली, सरफराज अहमद आणि फखर जमान या तिघांना १५ सदस्यीय संघात संधी दिली गेली आहे. यापूर्वी संघात संधी दिली गेलेल्या आजम खानला आता संघातून बाहेर करून त्याच्याजागी सरफराज अहमदला संधी मिळाली आहे. तसेच मोहम्मद हसनैनच्या जागी हैदर अलीला सामील केले गेले आहे. तसेच आधी विश्वचषकासाठी राखीव खेळाडूच्या रूपाl संधी दिली गेलेल्या फखर जमीनला आता खुशदिल शाहच्या जागी मुख्य संघात सामील केले गेले आहे.
याव्यतिरिक्त शोएब मकसूदला पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या बदली खेळाडूची घोषणा अद्याप झालेली नाही.
टी२० विश्वचषक २०२१ साठी पाकिस्तानचा १५ सदस्यीय संघ :
बाबर आजम (कर्णधार),शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमन, हैदर अली, हैरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, शोएब मकसूदचा पर्यायी खेळाडू
टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाचे राखीव खेळाडू :
खुशदिल शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. हा सामना २४ ऑक्टोबरला दुबईमध्ये खेळला जाईल.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे टी२० विश्वचषकातील वेळापत्रक
२४ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड (शारजाह क्रिकेट स्टेडियम)
२९ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगानिस्तान (दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम)
२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध (संघ निश्चित नाही) (शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी)
७ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध (संघ निश्चित नाही) – (शारजाह क्रिकेट स्टेडियम)
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडण्याबाबत कोहलीने जवळच्या मित्राशी केली होती चर्चा, स्वत: केला उलगडा
आरसीबीच्या पिटाऱ्यातील छुपा सितारा ‘श्रीकर भरत’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार, वाचा त्याच्याबद्दल