---Advertisement---

क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा

---Advertisement---

भारतात क्रिकेटला एका धर्माचा दर्जा दिला जातो. प्रत्येक वयोगटातील लोक क्रिकेटचा आनंद घेत असतात. भारताच्या सुदृढ क्रिकेटपटूंसह दिव्यांग खेळाडूंचा देखील एक संघ आहे. त्या संघातील खेळाडू राजा बाबू यांची सध्या भलतीच चर्चा सुरू आहे.

वयाच्या आठव्या वर्षीच राजा बाबू यांना एका अपघातात आपला डावा पाय गमवावा लागला होता. त्यानंतर त्यांना घरातल्यांनीही काहीशी वेगळी वागणूक दिली. आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचे त्यांचे देखील मन होत. आपली क्रिकेटची आवड जपण्यासाठी त्यांनी एका पायानेच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ज्यावेळी त्यांच्या दिव्यांग संघाला एका स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली तेव्हा, राजा बाबू यांनी पाच सामन्यांमध्ये ७० षटकार खेचत प्रसिद्धी मिळवली होती. विशेष म्हणजे त्यांनी या स्पर्धेतील सर्व पुरस्कार आपल्या नावे केले होते. पूल आणि हुक हे त्यांचे आवडते फटके आहेत.

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी राजा बाबू ई-रिक्षा चालवतात. त्यांना ओळखणारे लोक असे देखील म्हणतात की राजा बाबू असे क्रिकेट खेळतात जे दोन पाय असलेल्या लोकांनाही खेळता येत नाही. राजा बाबू यांना सरकारकडून एका चांगल्या नोकरीची अपेक्षा आहे. तसेच ते आपल्या मुलाला भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना पाहून इच्छितात.

महत्त्वाच्या बातम्या-

‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच

थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श

सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर

 

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---