इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताकडे इंग्लंडमध्ये १५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण शेवटचा सामना गमावल्यामुळे असे होऊ शकले नाही. इंग्लंडसाठी जॉनी बेयरस्टोने दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले आणि सामनावीर ठरला. दुसऱ्या डावात भारताचा महत्वाचा फलंदाज हनुमा विहारीने एक मोठी चूक केली, ज्याची किंमत म्हणून संघाला सामना गमवावा लागला.
सामन्याच्या शेवटच्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य इंग्लंडने अवघ्या ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. सामन्यात भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना अनेक चुका केल्या, ज्यामुळे संघाला सामन्यातून हात धुवावा लागला. यामध्ये सर्वात मोठी चूक ठरली, ती दुसऱ्या डावात जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याचा झेल सोडणे. शेवटच्या डावात बेयरस्टोला दोन वेळा जीवनदान मिळाले. यापैकी एकदा हनुमा विराही (Hanuma Vihari) आणि दुसऱ्यांदा रिषभ पंतकडून चूक झाली.
बेयरस्टोने दुसऱ्या डावात ११४ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. परंतु भारतीय संघ त्याला खूप स्वस्तात बाद करू शकत होता. मात्र, हनुमा विहारीने त्याला जीवनदान दिले आणि नंतर त्याने जो रुटसोबत मिळून भारताला पराभवाची धूळ चारली. वैयक्तिक १४ धावांवर खेळत असताना बेयरस्टोने स्लिप्समध्ये उभा असेलल्या विहारीच्या हातात झेल दिला होता, परंतु त्याला तो झेल पकडता आला नाही. त्यानंतर बेयरस्टोने ३९ धावा केल्या होत्या, तेव्हा यष्टीरक्षक पंतकडे त्याला बाद करण्याची संधी होती, पण पंतनेही त्याला जीवनदान दिले.
Hanuma vihari dropped catch of Jonny bairstow. #hanumavihari #Vihari dropped catch of #JonnyBairstow #INDvsENG #INDvENG pic.twitter.com/YVp40t0zNs
— Shribabu Gupta (@ShribabuG) July 5, 2022
तत्पूर्वी बेयरस्टोने पहिल्या डावात १४० चेंडूत १०६ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला कसेबसे २८४ धावांपर्यंत पोहोचवले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने एकूण १४५ चेंडूत ११४ धावांचे योगदान दिले. जो रुट (१४२) आणि बेयरस्टो यांच्यात चौथ्या विकेटसाठी २६९ धावांची भागीदारी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंंग्लंड विरुद्धच्या पराभवानेे भारताच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या अडचणी वाढल्या, वाचा काय आहे समीकरण
हे काय? थेट खेळाडूवर भडकले अंपायर; स्टुअर्ट ब्रॉडवर रागवत भर मैदानात पंच म्हणाले, ‘शांत बस…’
भारत हारला, पण बुमराह जिंकला; फक्त कौतुकच करावं असं प्रदर्शन करत मानाचा अवॉर्ड घेऊन गेला