---Advertisement---

Video: तयारी जोमात! पहिल्याच काउंटी सामन्यात विहारीने टिपला एकहाती भन्नाट झेल; इंग्लिश खेळाडूही पाहून दंग

---Advertisement---

एकीकडे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये काउंटी स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा कसोटीपटू हनुमा विहारी याने काउंटी स्पर्धेत सहभाग घेतला असून नुकतेच त्याने या स्पर्धेत पदार्पण केले आहे. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात असा काही पराक्रम केला आहे, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात हनुमा विहारीने देखील आपला सहभाग नोंदवला होता. परंतु त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी स्पर्धा खेळण्याच्या निर्णय घेतला होता. यंदा तो आपल्या फलंदाजी किंवा गोलंदाजीमुळे नव्हे तर चक्क क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला आहे. तो या स्पर्धेत वार्विकशायर संघातून खेळत आहे.

वार्विकशायर आणि नॉटिंघमशायर यांच्यातील सामन्याला १५ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यातील ४१ व्या षटकात नॉटिंघमशायर संघातील फलंदाज स्टीवन मुलने एक शॉट खेळला, ज्याचा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता. यावेळी हनुमा विहारीने एका हाताने डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. यानंतर त्याच्या अप्रतिम झेलमुळे सर्वच खेळाडू त्याच्याकडे आश्चर्याने पाहात होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात हनुमा विहारीला गोलंदाजी करण्याची देखील संधी मिळाली होती. त्याने आपल्या पहिल्याच षटकात ११ धावा खर्च केल्या होत्या.

भारतीय संघाला येत्या जून महिन्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळायचा आहे. या संघात हनुमा विहारीचा देखील सामवेश असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेत भिडणार आहेत. त्यामुळे हनुमा विहारी ही स्पर्धा सराव स्पर्धा म्हणून देखील पाहात असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेयसी नव्हे तर ‘हे’ माझं पहिलं प्रेम; ईशान किशनच्या खुलास्यावर गर्लफ्रेंड आदिती म्हणते…

मिस्टर अँड मिसेस बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण; संजना म्हणते, ‘या’ गोष्टीची खूप आठवण येतेय

“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---