---Advertisement---

मिस्टर अँड मिसेस बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण; संजना म्हणते, ‘या’ गोष्टीची खूप आठवण येतेय

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 1:07 PM
---Advertisement---

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 15 मार्च 2021 रोजी टीव्ही अँकर संजना गणेशनबरोबर लग्न केले असून गुरूवारी (15 एप्रिल) रोजी त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने बुमराहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून यामध्ये त्याने संजनाचे आपली सर्वात चांगली मैत्रिण म्हणून वर्णन केले आहे. तर त्याची पत्नी संजनाने देखील या निमित्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या एक पोस्ट केली असून भन्नाट असे कॅप्शनही दिले आहे.

बुमराहने आपला व पत्नी संजनाचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘प्रेमाला एक महिना पूर्ण, हास्य, विनोद, दीर्घ चर्चा आणि शांती. माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीशी लग्न करून एक महिना पुर्ण झाला.’

लग्नासाठी बीसीसीआयने बुमराहला सुट्टी दिल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळला नव्हता. परंतु सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असून आयपीएल सामने खेळण्याकरीता तो संघासह चेन्नईमध्ये आहे.

दुसरीकडे संजनाही आयपीएल प्रेझेंटर असल्याने तीदेखील आयपीएल २०२१ मध्ये व्यस्त आहे. तिने आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्या निमित्ताने पतीसोबत केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आजच्या दिनी मला माझ्या पतीची आणि त्याच्या केकची खूप आठवण येत आहे.’

Photo Courtesy: Instagram/@sanjanaganeshan

बुमराह प्रतिनिधित्व करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2021 मधील सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु पुढच्या सामन्यात पुनरागमन करत त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला.

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून बुमराहने खूप चमकदार कामगिरी केली असून सध्या तो संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज बनला आहे. आतापर्यंत त्याने 19 कसोटी, 67 एकदिवसीय आणि 49 टी -20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तर पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा तो महत्त्वाचा गोलंदाज बनला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 94 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 111 बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश

हार्दिकने शेअर केला लाडक्या लेकासोबतचा ‘क्यूट व्हिडिओ’, अनुष्काची प्रेमळ प्रतिक्रिया ठरली लक्षवेधी

‘या’ कारणामुळे चुरसीची लढत जिंकण्यात दिल्ली कॅपिटल्स ठरली अपयशी, कर्णधार पंतने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---