---Advertisement---

“रोहित, विराट पोस्टपेड तर संजू प्रीपेड सिम कार्ड,” खास उदाहरणासह दिग्गजाचा सॅमसनला मोलाचा उपदेश

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 12:37 PM
---Advertisement---

गुरुवारी (१५ एप्रिल) रोजी पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. मागील सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार, संजू सॅमसन हा या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने त्याच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना, कर्णधार संजू सॅमसन अवघ्या ४ धावा करत माघारी परतला होता. त्यांनतर डेविड मिलर आणि क्रिस मॉरिसच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना जिंकला.

अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने संजू सॅमसनच्या फलंदाजीबद्दल भाष्य करत म्हटले आहे की, “मला संजू सॅमसनबद्दल एक गोष्ट आवर्जुन सागांवी वाटते. जेव्हा तो भारतीय संघांत आला होता, तेव्हा संघात रिषभ पंत नव्हता, ईशान किशन नव्हता. त्यामुळे संजू प्री-पेड सिम कार्ड सारखा आहे, ज्यांचे मर्यादित कालावधीत नूतनीकरण करणे आवश्यक असते. अथवा सिम डेड होऊ शकते.”

“हेच विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पोस्ट-पेड सिम कार्डसारखे आहेत. ते बिल न भरता आपला कालावधी पुढे सरकवू शकतात. त्यामुळे संजूसहित सर्व युवा युवा खेळाडूंना समजून घ्यावे लागेल की, ते पोस्ट-पेड सिम कार्ड नाहीतर प्री-पेड सिम कार्ड आहेत. त्यांना पोस्ट पेड होण्यासाठी खेळामध्ये सातत्य कायम ठेवावे लागेल,” असे ओझाने पुढे सांगितले.

थोडक्यात सांगायचे झाले तर, ओझाने संजूसह सर्व युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी किंवा संघातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्रदर्शनात निरंतरता ठेवणे गरजेचे आहे, असं सांगितले आहे.

सॅमसनने जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय टी२० संघात पदार्पण केले होते. परंतु त्याला साजेशी खेळी करता न आल्याने पुढे जास्त संधी मिळाल्या नाहीत. आतापर्यंत त्याने भारताकडून ७ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने एकही अर्धशतक न करता अवघ्या ८३ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”

‘या’ कारणामुळे चुरसीची लढत जिंकण्यात दिल्ली कॅपिटल्स ठरली अपयशी, कर्णधार पंतने दिली प्रतिक्रिया

पहिल्या सामन्यातील ‘त्या’ निर्णयाबद्दल संजूने मांडले मत; म्हणाला, “मी १०० वेळा तो सामना खेळलो तरी…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---