भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने ३० एप्रिलला आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. जगातील सर्वात विस्फोटक सलामीवीर फलंदाज रोहितने मागील वर्षी विश्वचषकात ५ शतके ठोकली होती. परंतु भारतीय संघाला विजयी होता आले नाही.
रोहितकडे सध्या मुंबईच्या वरळीमध्ये ३० कोटी रुपयांचे प्रशस्त असे घर आहे. सध्या रोहित जगातील अव्वल १० खेळाडूंमध्ये गणला जातो. परंतु एक असा काळ होता ज्यामध्ये रोहितकडे शाळेतील शुल्क भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. इतकेच नव्हे तर त्याच्या मित्रांनी त्याला क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले होते.
रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. क्रिकेट अकादमीमध्ये दाखल करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. तो त्याच्या मित्रांबरोबर आणि काकांबरोबर वारंवार क्रिकेटबद्दल चर्चा करत होता. त्याची क्रिकेटबद्दलची ही आवड पाहून त्याच्या काकांनी आणि मित्रांनी ५०-५० रुपयांचा निधी जमा करून १९९९मध्ये त्याचे ऍडमिशन एका अकादमीमध्ये केले होते.
सुरुवातीला रोहित फिरकीपटू होता. त्याने आयपीएलमधील फ्रंचायझी डेक्कन चार्जर्स या संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिकदेखील घेतली होती.
खरंतर एकदा रोहितने एका क्रिकेट कॅंपमध्ये भाग घेतला होता. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विद्यालयाचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी त्याची प्रतिभा पाहिली होती. लाड यांनी रोहितला विवेकानंद विद्यालयात दाखल केले होते. पुढे लाड यांनीच रोहितला फलंदाजी करण्यासाठी सांगितले होते.
फलंदाज म्हणून रोहितने विद्यालयाअंतर्गत झालेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात १२० धावांची शतकी खेळी केली होती. पुढे रोहितने आपल्या खेळात सातत्य ठेवल्याने त्याला २००७ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघात सामील करून घेतले होते. त्याने आयर्लंडविरुद्ध आपला पहिला वनडे सामना खेळला होता.
त्याचवर्षी रोहितने सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध आपला पहिला टी२० सामना खेळला होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२०तील एकूण १३ वर्षांच्या कारकीर्दीत १०८ सामने खेळला आहे. त्याने ३२.६२ च्या सरासरीने एकूण २७७३ धावा केल्या आहेत. तसेच तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहितच्या नावावर टी२०मध्ये सर्वात वेगवान शतक (Fastest Century) करण्याचा विक्रमदेखील आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध इंदोरमध्ये २०१७मध्ये ३५ चेंडूत शतकी खेळी केली होती. यावेळी रोहितने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरची (David Miller) बरोबरी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघात १०० वर्षाच्या खेळाडूचा समावेश, आता थेट…
-शमीच्या गोलंदाजीचा सामना करणे पडले महागात, मंधानाला १० दिवस चालणेही झाले होते कठीण
-वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू