---Advertisement---

Video: फलंदाजीला येताना एकदा बॅट तर एकदा ग्लोव्ज विसरलेला खेळाडू

On: सोमवार, मे 4, 2020 11:50 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद आणि वस्तू विसरणे हे क्रिकेटमध्ये नविन नाही. ऑस्ट्रेलियाकडून ३ वनडे व २ टी२० खेळलेला फवाद फलंदाजीला येताना सतत काहीतरी विसरत असतो. 

मार्च २०१७मध्ये शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजीला येताना हा खेळाडू चक्क बॅट विसरला होता. जवळपास मैदानात बरच चालतं आल्यावर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली होती. नंतर तो तिथून मागे फिरला होता व त्याला संघसहकाऱ्याने बॅट आणून दिली होती.

तर ऑक्टोबर २०१७मध्ये त्याच्या पुढे जात त्याने एकाच हाताचे दोन ग्लोव्ज फलंदाजीला येताना आणले होते. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा परत ड्रेसिंग रूममध्ये परत जात त्याने दुसऱ्या हाताचा ग्लोव्ज आणला.

याचा खास विडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. व्हिक्टोरिया विरुद्ध क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला येत होता तेव्हा तो अचानक मागे फिरला आणि पुन्हा संघासहकाऱ्यांना तिथूनच सांगितले की तो चुकीचा ग्लोव्ज घेऊन आला आहे.

यावर एक छान कॅप्शन देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केला होता की चला फवाद दिवसेंदिवस चुका कमी करत आहे. गेल्या वेळी बॅट होती यावेळी ग्लोव्ज आहे.

https://twitter.com/CricketAus/status/923781868780118016?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Fafter-steve-smiths-brain-fade-moment-fawad-ahmed-joins-the-act-1768188

ट्रेंडिंग घडामोडी – 

७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत

ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment