---Advertisement---

आजी-माजी क्रिकेटपटूंकडून ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनावर झाला शुभेच्छांचा वर्षाव, पहाच

On: गुरूवार, नोव्हेंबर 28, 2019 11:55 AM
---Advertisement---

भारतीय संघातून बऱ्याच दिवसांपासून दूर असलेला भारतीय फलंदाज सुरेश रैनाने काल (27 नोव्हेंबर) त्याचा 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने सुरेश रैनाला (Suresh Raina) जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून देणारा सुरेश रैना आक्रमक फटकेबाजी आणि लांब फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. टी20 प्रकारातील त्याने अनेक मोठे विक्रम केले आहेत. तसेच तो ‘मिस्टर आयपीएल’ (Mr. IPL) म्हणूनही ओळखला जातो.

रैनाच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीनेही खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आयसीसीने रैनाचा एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे की ‘तूम्हाला माहिती आहे का रैना हा कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट या तिन्ही प्रकारात शतक करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू आहे.’

तसेच बीसीसीआयने रैना ‘ये शाम मस्तानी’ हे गाणे गात असलेला व्हिडिओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रैनाच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) शुभेच्छा देताना म्हटले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तू परिश्रम करत रहशील आणि जगभरातील चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी देत ​​रहशील अशी आशा आहे. तूला शुभेच्छा.”

 

आयपीएलमधील सुरेश रैनाचा संघ चेन्नई सुपर किंग्सने (Channai Super Kings) त्याच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Eleven) 87 धावांची खेळी खेळताना दिसत आहे.

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी रैनाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत सांगितले की, ‘हे वर्ष तुझ्यासाठी प्रेमाचे आणि आनंदाचे जावे.’

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) सुरेश रैनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. आयपीएलच्या आगामी मोसमात तुझ्या फलंदाजीची खूप प्रतीक्षा आहे. मिस्टर आयपीएल आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

टी20 आणि वनडे विश्वचषकात शतक ठोकणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. 2005 मध्ये रैनाने श्रीलंकेविरूद्ध वनडे पदार्पण केले होते. वनडेमध्ये पदार्पण केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी रैनाला 5 वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

त्याने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्धच कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक ठोकले होते.

रैनाला वाढदिवसानिमित्त दिल्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---