भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याचा आज ४२ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याला विविध माध्यमांतून शुभेच्छा मिळत आहेत. त्यातच त्याचा सहकारी मित्र 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंग (Yuvraj Singh) शुभेच्छा देताना म्हणाला की, “तू इतका गंभीर नाहीस. माझा मित्र गौतम गंभीरला (Gautam Gambhir) वाढदिवसाच्या शुभेच्छा, तो त्याच्या मतांबद्दल जितका गंभीर आहे तितकाच तो त्याच्या धावांबद्दल आहे. खूप प्रेम भावा. तुझे येणारे वर्ष खूप उत्साहाचे जावो.”
2011 च्या विश्वचषकातील विजयाचे सर्वाधिक श्रेय युवराज सिंगला मिळावे, असे गौतम गंभीरने अनेकदा म्हटले आहे. गंभीरने अनेक वेळा युवराज सिंगचे कौतुकही केले आहे. आता गंभीरच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज सिंगने ट्विट करत त्याला या शुभेच्छा दिल्या आहेत.
गौतम गंभीरने 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. भारतीय संघाच्या दोन विकेट्स लवकर पडल्या असताना त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार एमएस धोनीसोबत (Ms Dhoni) उत्कृष्ट भागीदारी रचून संघाच्या विजयाचा पाया रचला होता. गौतम गंभीर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. त्यानंतर 4 डिसेंबर 2018 रोजी त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
गौतम गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. याशिवाय 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा गंभीर देखील महत्त्वाचा भाग होता. (Happy Birthday to Gambhir from Yuvraj Said You are not that serious)
महत्वाच्या बातम्या –
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा खेळ खल्लास! दोन धडाकेबाज फलंदाज तंबूत
भारताविरुद्ध पहिले अर्धशतक साकारताच तंबूत परतला बाबर, सिराजने केला सुपडा साफ