भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित खेळी करताना दिसत नाहीये. राहुलच्या याच सुमार प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील माजी दिग्गज आमने सामने आल्याचेही दिसत आहे. अशातच आता भारताची माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने हे तापलेले वातावरण शांत करण्याच्या प्रयत्नात एक ट्वीट केले.
केएल राहुल (KL Rahul) खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी संघात निवडले. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलची बॅठ शांत राहिली असून यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसली. 1 मार्च रोजी सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला खेळण्याची संधी मिळणार नाही, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटच्या दोन सामन्यांशाटी बीसीसीआयने रविवारी (20 फेब्रुवारी) संघ घोषित केल्यानंतर त्या राहुलचे नाव होते, पण संघाचे उपकर्णधारपद मात्र त्याच्याकडून काढून घेतले गेले होते.
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांच्या मते राहुलला त्याच्या सततच्या खराब प्रदर्शनामुळे संघातून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. तर दुसरीकडे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा याने राहुलचे समर्थन केले आहे. या दोघांमध्ये राहुलच्या मुद्यावरून वातावरण पेटल्याचेही पाहायला मिळाले होते. अशातच हरभनज सिंग (Harbhajan Singh) याने अपेक्षा व्यक्त केली आहे की, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात राहुल त्याच्या खराब फॉर्मवर मात करेल. “आपण केएल राहुलला एकटे सोडू शकतो का? त्याने कुठला गुन्हा केला नाहीये. तो आजही सर्वोत्तम खेळाडू आहे. तो चांगले पुनरागमन करेल. आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा काळातून जातो. अशा अनुभव घेणारा राहुल पहिला आणि शेवटचा नाहीये. त्यामुळे कृपया सथ्य परिस्थितीचा आदर ठेवा आणि तो आपलाच खेळाडू आहे. त्यावर विश्वास ठेवा,” असे हरभजन सिंग ट्वीटच्या माध्यमातून म्हणाला.
Can we leave @klrahul alone guys ? He hasn’t done any crime.He is still a top player. He will come back strong.we all go thru such patches in international cricket.he is not the first one and last one. so please respect the fact that he is our own 🇮🇳 player and have faith 🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 21, 2023
दरम्यान, मंगळवारी (21 फेब्रुवारी) वेंकटेश प्रसाद यांना आकाश चोप्राने ट्वीटरवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. पण प्रसाद यांनी या चर्चेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या मागच्या एका वर्षातील प्रदर्शनावर नजर टाकली, तर आकडेवारी खूपच निराशाजनक असल्याचे दिसते. त्याने मागच्या एका वर्षात अवघ्या 17.12च्या सरासरीने धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा खेळत नसताना त्याने भारताचे नेतृत्व देखील केले होते. (Harbanj Singh tweeted in support of KL Rahul)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! तीन धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, ‘हा’ दमदार खेळाडूही परतला मायदेशी; जाणून घ्याच
चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा संसार रस्त्यावर, पाणावलेल्या डोळ्यांसह सांगितल्या वेदना