---Advertisement---

बधाई हो भज्जी! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव क्रिकेटपटू

On: रविवार, एप्रिल 11, 2021 10:31 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यातून भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने केकेआरसाठी पदार्पण केले. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

‘या’ तीन संघांचे प्रतिनिधित्व करणारा पहिला खेळाडू
सध्या ४० वर्षाचा असलेला हरभजन आज केकेआरसाठी आपला पहिला सामना खेळला. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील तिसरा संघ आहे. हरभजनने यापूर्वी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. मैदानावर उतरताच हरभजनने एकापेक्षा अधिक आयपीएल विजेतेपदे पटकावणाऱ्या संघांकडून खेळण्याची कामगिरी केली.

हरभजनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील अकरा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खेळले. त्यापैकी तीन हंगामांत तो विजयी संघाचा भाग होता. त्यानंतर, २०१८ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग बनला. चेन्नईने २०१० व २०११ असे दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले होते. चेन्नईने २०१८ मध्ये पुन्हा एकदा विजेतेपदाचा मान मिळवला. आता केकेआरसाठी खेळतात तो तिसऱ्या अशा संघासाठी खेळत आहे, ज्या संघाने कमीत कमी दोन वेळा आयपीएल जिंकले आहे. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल जिंकले होते.

हरभजनची आयपीएल कारकीर्द
मागील चार वर्षापासून राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला हरभजन केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो‌. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १६१ सामने खेळताना १५० बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. हरभजनने काही काळ मुंबई इंडियन्सचे नेतृत्व देखील केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

राणाजी रॉक्स! रोहित आणि वॉटसननंतर अशी कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा फलंदाज

एमएस धोनी यंदा खेळतोय अखेरची आयपीएल? ‘या’ गोष्टीमुळे मिळत आहेत संकेत

हे आहेत सनरायझर्सचे ‘जबरा फॅन’, वॉर्नरने शेअर केली छायाचित्रे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---