मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने युएईमध्ये होणार्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. सीएसकेचा उप-कर्णधार सुरेश रैनानंतर आयपीएलमधून माघार घेणारा हरभजन हा दुसरा खेळाडू ठरला आहे.
कोरोना सारख्या कठीण काळात आपल्या कुटुंबासमवेत राहण्याची इच्छा असल्याचे हरभजनने स्पष्ट केले. तो म्हणाला की, “मी फक्त इतकेच म्हणेन की काही वेळा खेळापेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे. माझे लक्ष सध्या माझ्या कुटुंबावर आहे, परंतु हो माझे हृदय युएईमध्ये माझ्या टीमकडे राहील.”
हरभजनच्या मित्राने आयपीएलमधून नाव मागे घेण्याबाबत विधान केले आहे. हरभजन आयपीएलमधून माघार घेण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांचे कुटुंब असल्याचे हरभजनच्या मित्राने सांगितले. तो म्हणाला, “दुबईतील चेन्नई सुपर किंग्जचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्याने माघार घेतले असे अजिबात नाही. पण हो, हे निश्चितपणे आहे की कोरोना काळात, जर तुम्ही तुमच्या कुटूंबापासून दूर असाल आणि तुम्हाला पत्नी व एक लहान मूल असेल, तर तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. जर असे झाले तर आपल्याला 2 कोटी किंवा 20 कोटी मिळत आहेत, काही फरक पडत नाही. शेवटी पैसा आपल्या डोक्यात असतो.”
तत्पूर्वी, हरभजन सांगितले की, सीएसके व्यवस्थापनाने त्याची अडचण समजून घेतल्याबद्दल ते नेहमी ऋणी असतील. तो म्हणाला, “जेव्हा मी माझ्या निर्णयाबद्दल सीएसके व्यवस्थापनाला सांगितले तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दर्शविला. याबद्दल मी त्यांचे जे काही आभार मानतो, ते कमीच आहे.” आयपीएलमधून बाहेर पडण्याबाबत हरभजनच्या अधिकृत घोषणेनंतर सीएसकेने त्या खेळाडूला पाठिंबा दर्शविला होता.
Dear Friends
I will not be playing IPL this year due to personal reasons.These are difficult times and I would expect some privacy as I spend time with my family. @ChennaiIPL CSK management has been extremely supportive and I wish them a great IPL
Stay safe and Jai Hind— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 4, 2020
संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन म्हणाले की, “हरभजन सिंगने आम्हाला सांगितले की तो वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध होणार नाही. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि या कठीण काळात त्याच्याबरोबर आणि त्याच्या कुटूंबासमवेत उभे आहोत.” या फिरकीपटूच्या जागी सीएसकेने कोणत्या गोलंदाजास किंवा फलंदाजाचा समावेश केला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कारण त्यांच्याकडे आधीच दर्जेदार गोलंदाज आहेत.
Harbhajan Singh informed us he won’t be available due to personal reasons. Team Chennai Super Kings is supportive of his decision and stands by him and his family during these testing times.
KS Viswanathan
CEO— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 4, 2020
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या हरभजनने 150 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लसिथ मलिंगा (170) आणि अमित मिश्रा (157) यांच्या मागे हरभजन तिसर्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फॅन्सच सोडा, १००-१०० मॅच खेळलेले क्रिकेटरच झाले धोनी फॅन, पहा व्हिडीओ
-शेर तो शेरच! कोरोनातही धोनीला आजही पहाण्यासाठी दुबईत चाहत्यांची गर्दी, पहा व्हिडीओ
-सचिन कर्णधार म्हणून ठरला फ्लाॅप, काँग्रेस नेत्याची सचिनवर खरमरीत टीका
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
-वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा
-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग