fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सचिन कर्णधार म्हणून ठरला फ्लाॅप, काँग्रेस नेत्याची सचिनवर खरमरीत टीका

September 6, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मुंबई । केरळमधील प्रसिद्ध राजकारणी आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे क्रिकेट प्रेम कोणापासून लपलेले नाही. वारंवार सोशल मीडिया चर्चेत असलेल्या थरूर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  थरूर यांच्या म्हणण्यानुसार, 90च्या मध्यातील सचिनपेक्षा संघाकडे चांगला पर्याय नव्हता, परंतु त्याच्या नेतृत्व कौशल्याने कधीच प्रभावित केले नाही.

स्पोर्ट्स वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेस नेते म्हणतात, ”जेव्हा तो कर्णधार नव्हता तेव्हा तो खूप सक्रिय दिसत होता. स्लिपमध्ये उभे राहून इकडे तिकडे पळायचा. कर्णधाराकडे पळत जायचा. तो सल्ले देत असे, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचा, पण सचिनला कर्णधार मिळाल्यानंतर त्याच्याविषयीचा माझी दृष्टीकोन पूर्णपणे बदलला.”

“सचिनकडे त्यावेळी मजबूत संघ नव्हता आणि त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं होतं, त्यामुळे तो कर्णधारपदी अपयशी ठरला.  अशा प्रकारे तो स्वतः कबूल करेल की सर्वात प्रेरणादायक, कर्णधार तो नव्हता. शेवटी त्याने आनंदाने कर्णधारपद सोडले,” असेही थरुर यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकर हा नेहमीच क्रिकेटपटूंसाठी आदर्श होता, त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. सचिनने सर्व गोष्टी साध्य केल्या, जे एक फलंदाज स्वप्नं म्हणून पाहत असतो. परंतु कर्णधार म्हणून तो यशस्वी होऊ शकला नाही.

1996 मध्ये भारतीय संघाची नेतृत्वाची धुरा हाती घेतलेल्या तेंडुलकरने 73 वनडे सामन्यांपैकी केवळ 23 सामने जिंकले. 43 सामने पराभूत झाले. त्याच्या विजयाची टक्केवारी फक्त 35.07 आहे.  कसोटीमध्ये ही तर ही आकडेवारी अधिकच खराब होती.  25 पैकी केवळ चार सामने जिंकले. नऊ सामन्यात दारुण पराभव झाला आहे.

 


Previous Post

शिक्षक दिनी भारतीय क्रिकेटरने आपल्या गुरूला भेट दिली स्काॅडा रॅपिड

Next Post

शेर तो शेरच! कोरोनातही धोनीला आजही पहाण्यासाठी दुबईत चाहत्यांची गर्दी, पहा व्हिडीओ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post

शेर तो शेरच! कोरोनातही धोनीला आजही पहाण्यासाठी दुबईत चाहत्यांची गर्दी, पहा व्हिडीओ

फॅन्सच सोडा, १००-१०० मॅच खेळलेले क्रिकेटरच झाले धोनी फॅन, पहा व्हिडीओ

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

२ कोटी असो नाहीतर २० कोटी, भारतीय क्रिकेटरला कुंटूंबीय आयपीएलपेक्षा अधिक प्रिय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.