---Advertisement---

शिक्षक दिनी भारतीय क्रिकेटरने आपल्या गुरूला भेट दिली स्काॅडा रॅपिड

---Advertisement---

नवी दिल्ली| शिक्षक दिन देशभरात काल साजरा केला गेला. यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले मार्गदर्शक राजकुमार शर्मासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली.

कोहलीने लिहिले की, “एक शिक्षक आपल्या प्रवासामध्ये बरेच महत्त्वाचे धडे शिकवतो. माझे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून मला जे मिळालं त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात शिक्षकांनी मार्गदर्शन केले अशा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

त्याचे बालपनीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट कोहलीच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोहली दिल्लीत वास्तव्यास असताना प्रशिक्षक राजकुमारकडून क्रिकेटची मुळअक्षरे शिकला.

कोहली त्याच्या प्रशिक्षकाचा खूप आदर करतो आणि 2014 मध्ये शिक्षक दिनानिमित्त त्याने स्कोडा रॅपिड ही भेटवस्तू आपल्या प्रशिक्षकाला दिली होती.

कोहली हा जागतिक क्रिकेटचा दिग्गज क्रिकेटपटू झाला असला तरी तो पहिल्या प्रशिक्षकाच्या शिकवण्याला कधीच विसरला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---