---Advertisement---

भावा, कुठे स्विमिंग पुलमध्ये होणार का सामना? ‘ते’ ट्वीट करत भज्जी नेटिझन्सकडून झाला ट्रोल

On: मंगळवार, जून 22, 2021 1:47 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शनिवारपासून (१९ जून) सुरुवात झाली आहे. परंतु पहिला दिवस हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे अपेक्षित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पुढे चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पुर्वी माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने असे काही ट्वीट केले होते, ज्यामुळे चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले.

आयसीसीचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे नियोजन नीट केले नसल्याने सर्व क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आतापर्यंत पूर्ण सामन्यात १४१ षटके टाकली गेली आहेत. तिसरा दिवस हा पूर्णपणे न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी भारतीय संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी केवळ २१७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर २ गडी गमावत १०१ धावाही केल्या आहेत.

चाहत्यांनी केले हरभजनला ट्रोल
यानंतर चौथ्या दिवशी पावसाने खोडा घालत चाहत्यांच्या उत्साहावर विरजन टाकले. त्यामुळे आयसीसीवर चौफेर टीका होत आहे. त्याचवेळी, चौथ्या दिवशी हरभजनने एक भविष्यवाणी केली, ज्याबद्दल चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या काही काळआधी हरभजनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन लिहिले की, “भारतीय संघाचा काल मैदानावर एक वाईट दिवस होता. चांगली गोष्ट म्हणजे तो दिवस आता संपला आहे. मला आशा आहे की, भारतीय संघ सर्व ३ सत्र जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

हरभजनने हे ट्विट करताच चाहत्यांनी साऊथॅम्प्टनमध्ये खराब हवामान आणि पावसाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. हरभजनच्या ट्विटवर चाहते संतप्त प्रतिक्रिया देतानाही दिसले. तर त्याचवेळी काहींनी हरभजन सिंगला आठवण करून दिली की, चौथा दिवस हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मग खेळाडूंनी स्विमिंग पुलमध्ये सामना खेळावा का.

महत्वाच्या बातम्या

राजस्थान रॉयल्सला बसणार मोठा झटका! ‘असे’ झाल्यास शतकवीर उर्वरित सामन्यांना मुकणार

पावसाच्या व्यत्ययानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी

WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---